जागेअभावी चार हजार जणांना मिळाले नाही हक्काचे छप्पर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:10 AM2021-02-12T04:10:57+5:302021-02-12T04:10:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील बेघर, कच्चे घर असलेल्या कुटुंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसाहाय्य देण्याच्या हेतूने २०१६ ...

Four thousand people did not get the right roof due to lack of space | जागेअभावी चार हजार जणांना मिळाले नाही हक्काचे छप्पर

जागेअभावी चार हजार जणांना मिळाले नाही हक्काचे छप्पर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील बेघर, कच्चे घर असलेल्या कुटुंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसाहाय्य देण्याच्या हेतूने २०१६ पासून पंतप्रधान आवास योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. मात्र, जवळपास ४ हजार १२ लोकांकडे जागाच नसल्याने त्यांना या योजनेचा लाभ घेता आलेला नाही. तर जागा असतानाही २ हजार २३१ जणांच्या घराचे काम होऊ शकले नाही.

ग्रामीण भागातील बेघर तसेच दारिद्र्यरेषेखालील लोकांना त्यांच्या हक्काचे घर बांधता यावे यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आली. ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी दीड लाख तर शहरी भागातील नागरिकांना अडीच लाख रुपये मदत या योजने अंतर्गत दिली जाते. जिल्ह्यातील ग्रामीण भागात २०१६ ला जवळपास २१हजार ४३८ घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. २०२१ पर्यंत ही घरकुले बांधण्याचा मानस होता. अल्पसंख्याकातून ६१५ , अनुसूचित जातीचे २ हजार ७५१, अनुसूचित जमातीचे ३ हजार ४४९ तरइतर १३ हजार ६२३ असे २१ हजार ४३८ लाभार्थी या योजनेचसाठी निवडण्यात आले होते. २०२० पर्यंत १४ हजार २३६ घरकुलांचे कामे पूर्ण करण्यात आली. मात्र, विविध कारणांमुळे योजेनेसाठी नोंदणी न होऊ शकलेल्या ९५९ लाभार्थ्यांना घरे बांधता आली नाही. उर्वरित ६ हजार २४३ जणांच्या घरकुलाचे काम प्रलंबित आहेत. यातील ४ हजार १२ जणांकडे जागाच नसल्यामुळे त्यांना घर द्यायचे कसे असा प्रश्न प्रशासनापुढे आहे. तर २ हजार २३१ जणांचे घरकुलाची कामे २०२१ मध्ये पूर्ण करायचे आहे, असे ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी संभाजी लांगोरे यांनी सांगितले.

चौकट

जागा मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू

जिल्ह्यातील घरकुल बांधण्यासाठी मिळालेल्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी प्रयत्न सुरू आहे. घर बांधण्यासाठी जागा नसल्याने घरकुल बांधण्यासाठी अडचणी आल्या. ज्यांच्याकडे जागा नाहीत त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडून किंवा गायरानातील जागा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच जागेचा प्रश्न सोडून घरकुलाचा प्रश्न सोडवला जाणर आहे.

कोट

जिल्ह्यातील पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुलांचे उद्दिष्ट बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत सर्व घरकुलांचे काम करण्याचा प्रयत्न आहे. ज्यांच्याकडे जागा नाहीत. त्यांना ग्रामपंचयातीमार्फत गायरान जमिनीवर जागा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. लवकरच यावर तोडगा निघण्याची आशा आहे.

- संभाजी लांगोरे, अधिकारी, ग्रामीण विकास यंत्रणा

चौकट

जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेली घरे -२१४३८

किती लोकांना पहिला हप्ता मिळाला - ८९७२

किती नागरिकांची घरे अपूर्ण आहेत - ७२४३

Web Title: Four thousand people did not get the right roof due to lack of space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.