तुकाईवाडी येथे चौपदरीकरण कामात होणारी चारी ग्रामस्थांनी थांबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:11 AM2020-12-06T04:11:24+5:302020-12-06T04:11:24+5:30

सांडभोरवाडी, तुकाईवाडी परिसरात पुणे नासिक महामार्ग चौपदरीकरणाचे काम चालू आहे. या कामाच्या अंतिम टप्प्यात दोन्ही बाजूने साईड गटर काढण्यात ...

Four villagers stopped the four-laning work at Tukaiwadi | तुकाईवाडी येथे चौपदरीकरण कामात होणारी चारी ग्रामस्थांनी थांबवली

तुकाईवाडी येथे चौपदरीकरण कामात होणारी चारी ग्रामस्थांनी थांबवली

Next

सांडभोरवाडी, तुकाईवाडी परिसरात पुणे नासिक महामार्ग चौपदरीकरणाचे काम चालू आहे. या कामाच्या अंतिम टप्प्यात दोन्ही बाजूने साईड गटर काढण्यात येत असून हे साईडची चारी ४ते ५ फुटे रुंद व तेवढेच खोल करण्यात येत आहे. ही चारी झाल्यानंतर स्थानिक शेतकरी, दुकानदार, ढाबा व हॉटेल चालक यांना रस्त्यावर येणे अवघड बनणार आहे. एक ते दोन किलोमीटर अंतरावर जाऊन वळसा घालून येजा करावी लागणार आहे. दोन्ही बाजूंनी जवळपास दोनशेहून अधिक शेतकरी, शंभरावर लहान मोठे व्यावसायिक आहेत. या परिसरात नागरिकांना रस्त्यावर येजा करण्यासाठी सलगपणे सिमेंट पाईपचे अथवा काँक्रीटचे बंदिस्त गटार करावे. अन्यथा हे गटर काम करू नये असा भुमिका घेत सांडभोरवाडीचे सरपंच अरुण थिगळे, तुकाईवाडीचे प्रवीण कोरडे, माजी सरपंच बाळासाहेब सांडभोर, व्यवसायिक किसन आरुडे, आदींनी या रस्त्याचे का थांबवले.

आवश्यकता असलेल्या नागरिकांनी महामार्ग प्रशासनाकडून परवानगी आणावी तेव्हाच रस्ता दिला जाईल. तसेच अशी परवानगी घेऊन ही व्यवस्था शेतकरी, व्यावसायिकानी स्वखर्चाने करावी असे उत्तर ठेकेदार संतोष घोलप यांनी शेतकऱ्यांना दिले. याचा निषेध म्हणून दोन्ही बाजूला सुरू असलेले काम शेतकर्‍यांनी व व्यावसायिकांनी एकत्र येऊन बंद पाडले.

Web Title: Four villagers stopped the four-laning work at Tukaiwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.