दौंडच्या चार गावांचा पाणीपुरवठा बंद

By admin | Published: October 2, 2015 01:05 AM2015-10-02T01:05:27+5:302015-10-02T01:05:27+5:30

दौंडला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात पाण्याचा ५0 टक्के साठा राहिला आहे. त्यानुसार येत्या ७ तारखेपासून लिंगाळी, सोनवडी, गोपाळवाडी, नानवीज या गावांना दौंड नगर परिषदेतर्फे

Four villages of Daund have stopped drinking water supply | दौंडच्या चार गावांचा पाणीपुरवठा बंद

दौंडच्या चार गावांचा पाणीपुरवठा बंद

Next

पाटस : दौंडला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात पाण्याचा ५0 टक्के साठा राहिला आहे. त्यानुसार येत्या ७ तारखेपासून लिंगाळी, सोनवडी, गोपाळवाडी, नानवीज या गावांना दौंड नगर परिषदेतर्फे केला जाणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सध्या दौंड शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरूआहे. येत्या आठवड्यात हा पाणीपुरवठा आठवड्यातून फक्त दोन दिवस करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी शिवाजी कापरे यांनी सांगितले.
सध्याच्या परिस्थितीत पावसाने ओढ दिल्यामुळे सर्वत्र पाणीटंचाई आहे. त्यातच तालुक्यातील जिराईत पट्ट्याला याचा फटका बसत आहे. तरी देखील शासनाची जबाबदारी म्हणून वासुंदे, ताम्हाणवाडी येथे पाण्याचा टँकर सुरू केल्याने काही प्रमाणत टंचाईवर मात करता आली तसेच कुसेगाव, पडवी, हिंगणीगाडा या ठिकाणी टँकरची मागणी आहे. त्यानुसार योग्य ते नियोजन केले जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Four villages of Daund have stopped drinking water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.