माळेगावमध्ये कुटुंबावर लोखंडी सत्तुराने वार करत प्राणघातक हल्ला; चौघे जण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 08:53 PM2021-02-17T20:53:12+5:302021-02-17T20:53:39+5:30
बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रूक येथे कुटुंबावर घातक शस्त्रांनी वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली.
बारामती : पाईपपाईनवरून ट्रॅक्टर-ट्रॉली का घेवून गेला, अशी विचारणा केल्याने माळेगाव बुद्रुक येथे कडाक्याचे भांडण झाले.या भांडणात एका कुटुंबावर लोखंडी सत्तुराने वार करण्यात आले. मंगळवारी (दि. १६) रोजी सायंकाळी माळेगाव ते कारखाना रस्त्यावर गव्हाणे यांच्या घरासमोर ही घटना घडली. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रूक येथे कुटुंबावर घातक शस्त्रांनी वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली. याप्रकरणी चौघांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी चौघांना उपचारासाठी बारामतीत हलविण्यात आले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत राहुल भाऊसाहेब गव्हाणे यांनी फिर्याद दिली आहे.त्यानुसार प्रशांत मोरे, आकाश मोरे, टॉम मोरे व एका अनोळखीचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. या घटनेत फिर्यादीचे वडील भाऊसाहेब नामदेव गव्हाणे व गणेश संजय गव्हाणे, भाऊ महादेव, वहिणी ज्योती महादेव गव्हाणे हे चौघे गंभीर जखमी झाले. जखमी चौघांना उपचारासाठी बारामतीत हलविण्यात आले आहे.
गव्हाणे कुटुंबाकडून म्हशीचे शेणखत वाहतूक केली जात होती. यावेळी पाईपपाईनवरून ट्रॅक्टर-ट्रॉली का घेवून गेला, अशी आरोपींनी विचारणा केली. या कारणावरून दुचाकीवरून येवून आकाश मोरे याने लोखंडी सतूराने भाऊसाहेब यांच्या डोक्यात जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केला. महादेव यांच्या डाव्या हाताच्या बोटावर, ज्योती यांच्या दोन्ही हातावर व गणेश यांच्या उजव्या हाताला यात इजा झाली. प्रशांत मोरे याने अन्य तिगांना भडकावून काठीने मारहाण करत अश्लिल शिवीगाळ करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.