पिंपरीत चारचाकी, दुचाकींपाठोपाठ चोरट्यांचा सायकलींवर डोळा; एकाच व्यक्तीच्या दोन सायकल चोरीला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 03:27 PM2021-07-20T15:27:50+5:302021-07-20T15:44:31+5:30
पिंपरी चिंचवड पोलिसांना शहरातील वाहनचोरी रोखण्यात अपयश येत असल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.पोलिसांना शहरातील वाहनचोरी रोखण्यात अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. इतके दिवस चारचाकी, दुचाकी यांच्या चोरीने पिंपरी चिंचवडकर हैराण झाले होते. मात्र, याच दरम्यान पिंपरी चिंचवडमधील नागरिकांच्या आणखी चिंतेत भर पडली आहे. सोमवारी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सात दुचाकी आणि दोन सायकलची चोरी झाली असून संबंधित पोलिस ठाण्यात वाहनचोरीचे गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.
शहरात दररोज चार ते पाच वाहने चोरीला जात असून वाहनचोर भरदिवसाही वाहनांची चोरी करू लागले आहेत. सोमवारी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सात दुचाकी आणि दोन सायकलची चोरी झाली असून संबंधित पोलिस ठाण्यांत वाहनचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात वाहनचोरीप्रकरणी पिंपरी, देहूरोड, तळेगाव दाभाडे, चाकण भोसरी, निगडी या पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अमित एकनाथ चव्हाण (वय ३२, रा. चिंचवड) यांनी दुचाकी चोरी प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चव्हाण यांनी त्यांची दुचाकी १६ जुलै रोजी थरमॅक्स चौकात पार्क केली असताना अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली.
अमोल मोहन हांडे (वय ३२, रा. दिघी रोड भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २६ जून रोजी भोसरी येथिल सार्वजनिक रस्त्यावर दुचाकी पार्क करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली.
चाकण पोलिस ठाण्यात योगेश राधाकिशन पगारे (वय ४०, रा. खालुंब्रे) यांनी वाहन चोरीची फिर्याद दिली आहे. पगारे यांची १७ जुलै रोजी त्यांची दुचाकी घरासोमेर हॅन्डेल लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली.
विशाल दत्तात्रय दवणे (वय १९, रा. दवणेवस्ती) यांनीही वाहन चोरीबाबत चाकण पोलिस फिर्याद दिली आहे. दवणे यांची दुचाकी ११ जुलै रोजी घारसमोर अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
शैलेश चिदानंद दोडमणी (वय ३५, रा. दळवीनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी दोडमणी यांनी ९ जुलै रोजी टाटा मोटर्स कंपनीच्या पार्किंगमध्ये दुचाकी पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने तेथून दुचाकी चोरून नेली.
सौफन मोफीजुल शेख (वय १८, रा. किवळे) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किवळे यांनी १६ जुलै रोजी किवळे येथिल जयभवानी मटन अण्ड चिकन शॉप समोर दुटाकी पार्क केली असता चोरट्याने ती चोरून नेली.
गणेश मुरलीधर रणधिर (वय २९, रा. गहुंजे) यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रणधिर यांनी आपल्या घराच्या समोर दुचाकी पार्क केली असता चोरट्याने चोरून नेली. तसेच दुचाकीच्या सिटखाली असलेली दुचाकीची मुळ कागदपत्रेही चोरट्याने चोरून नेली.
चिंचवड येथून एकाच व्यक्तीच्या दोन सायकलची चोरी...
चिंचवड येथे बाजीराव सदाशिव नाईक (वय ४२, रा. प्रेमलोक पार्क, चिंचवड) यांच्य घराच्या पार्किंगमधून दोन सायकलची चोरी झाली आहे. या प्रकरणी त्यांनी चिचंवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायकल चोरीचा हा प्रकार सात ते १५ जुलै दरम्यान घडला आहे. अज्ञात व्यक्तीने नाईक यांच्या घराच्या पार्किंगमध्ये असलेली चार हजार रुपये व दोन हजार रुपये किंमत असलेल्या दोन सायकल चोरून नेल्या.