विजेचा शॉक लागून चार वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, राजगुरुनगर येथील चव्हाणमळा येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 11:46 AM2022-04-22T11:46:15+5:302022-04-22T13:09:18+5:30
या घटनेमुळे या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे...
राजगुरूनगर : विजेचा शॉक लागून चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चव्हाणमळा - होलेवाडी (ता खेड ) घडली आहे. शिवम सोमनाथ टाकळकर असे मुत्यूमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. ही घटना गुरुवारी दि २१ रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, होलेवाडी - चव्हाणमळा येथील गुरूदेव साम्राज्य सोसायटीमध्ये चार वर्षाचा शिवम घराबाहेरील गॅलरीत खेळत होता. खेळता- खेळता गॅलरीच्या भिंतीला असलेल्या नादुरुस्त विद्युत लॅपला शिवमचा पायाचा स्पर्श झाल्याने त्याला विजेचा जोरदार झटका बसला.
या विजेच्या धक्यात शिवमचा जागीच मृत्यू झाला. याबाबत सागर सतिश वाबळे यांनी खेड पोलिस ठाण्यात खबर दिली असून या घटनेची अकस्मात मुत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.