अधिका-यासह लिफ्टमध्ये अडकले चौघे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 04:02 AM2017-08-01T04:02:13+5:302017-08-01T04:02:13+5:30
येथील एलआयसी कार्यालयातील वारंवार बंद पडणारी लिफ्ट; त्यामुळे कार्यालयीन कर्मचाºयांसह नागरिकांना होणारा त्रासामुळे सर्वच जण त्रस्त आहेत.
विमाननगर : येथील एलआयसी कार्यालयातील वारंवार बंद पडणारी लिफ्ट; त्यामुळे कार्यालयीन कर्मचाºयांसह नागरिकांना होणारा त्रासामुळे सर्वच जण त्रस्त आहेत. विमा कार्यालयातील विकास अधिकारीच परवा इतर चार जणांसह लाईट गेल्यामुळे लिफ्टमध्ये अडकले होते. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी; अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा संबंधित विकास अधिकाºयाने विभागाच्या शाखा प्रबंधकांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
विमाननगर चौकात एका खासगी इमारतीत एलआयसी कंपनीचे कार्यालय आहे. मात्र, या इमारतीतील लिफ्ट वारंवार बंद पडत असते. पार्किंगची एलआयसी कार्यालयात येणाºया कर्मचारी, एजंट, ग्राहक यांना पार्किंगसाठी कोणतीही सुविधा नाही. सोमवारी लिफ्ट अचानक बंद पडल्याने लिफ्टमध्ये एलआयसीचे विकास अधिकाºयांसह पाच जण अर्धा तास अडकले होते. अर्धा तासानंतर त्यांना लिफ्टमधून बाहेर काढण्यात आले. मात्र, वारंवार बंद पडणाºया लिफ्टमुळे अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत.
एलआयसी कार्यालयाचे मात्र खासगी विकसक लाखो रुपयांचे महिन्याचे भाडे स्वीकारत आहेत. मात्र, सुविधा कोणत्याच देत नाहीत.
विकास अधिकारी विवेक देव यांनी याबाबत शाखा प्रबंधकांसह एलआयसीच्या वरिष्ठ कार्यालयांना पत्र लिहीले आहे.