अकरा वर्षांपासून फ्लॅटचा ताबाच न देता चौदा कोटींची केली फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 06:54 PM2019-09-27T18:54:19+5:302019-09-27T19:02:38+5:30

याप्रकरणी हडपसर येथे राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे...

Fourteen crores of fraud without the possession of a flat for eleven years | अकरा वर्षांपासून फ्लॅटचा ताबाच न देता चौदा कोटींची केली फसवणूक

अकरा वर्षांपासून फ्लॅटचा ताबाच न देता चौदा कोटींची केली फसवणूक

Next
ठळक मुद्देबिल्डर ललितकुमार जैन यांच्यासह आणखी दोघांवर गुन्हा दाखल२४ फ्लटचे पैसे घेऊन  अन्य कामांकरिता केला वापरही घटना २७ मे २००९ ते १५ मे २०१९ दरम्यान

पुणे : ग्राहकांकडून २४ फ्लँटकरिता १३ कोटी ४० लाख ८९ हजार ५२४ रुपये घेऊन तब्बल अकरा वर्षांपासून फ्लँटचा ताबा न देणाऱ्या कुमार प्रॉपर्टीजचे बिल्डर ललितकुमार जैन यांच्यासह झेंडर कंपनीचे राकेश शहा व अपर्णा गोयल यांच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हडपसर येथे राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे. अद्याप कुणाला अटक केली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २७ मे २००९ ते १५ मे २०१९ दरम्यान घडली. फिर्यादीं यांनी ४५ निर्वाण हिल्स या प्रोजेक्ट मधील १४ व्या मजल्यावरील ६०१ क्रमांकाचा फ्लँट याबरोबरच तळमजल्यावरील पार्किंग हे नोंदणीकृत दस्तानुसार ८ मार्च २०१० रोजी १ कोटी ९ लाख ९२ हजार ९७५ रुपयांना खरेदी केले. करार नाम्यानंतर फियार्दी यांची सुन यांच्या बँक खात्यावरुन २२ लाख रुपये व फिर्यादी यांनी कर्ज घेतलेल्या रक्कमेतील ५७ लाख १७ हजार ४११ असे मिळून ७९ लाख १७ लाख ४११ रुपयांची रक्कम आरोपी यांच्या बँकेतील खात्यावर जमा केली. मात्र त्यांनी ती रक्कम फ्लँट करिता न वापरता इतर कामासाठी वापरली. तसेच फिर्यादीला दिलेल्या मुदतीनुसार फ्लॅटचा ताबा करारनाम्याप्रमाणे २०१३ मध्ये देय असताना तो दिला नसल्याचे दिसून आले.बरोबरच इतर २३ ग्राहकांकडून आरोपी यांनी फ्लॅटपोटी १३ कोटी ४० लाख ८९ हजार ५२४ रुपये घेतले आहेत. त्यांनी हे पैसे फ्लँटसाठी वापरले नसल्याचे तक्रारीत नमुद केले आहे.  व इतर साक्षीदार यांना ताबा वेळेत न दिल्यामुळे बिल्डरने त्यांच्याकडून प्राप्त रकमेवर व्याज देणे बंधनकारक असताना ते त्यांना अद्याप देण्यात आलेले नाही. 
 फिर्यादीं व इतर साक्षीदार यांना फ्लॅट बुक करताना दाखविलेल्या नकाशात त्यांच्या संमतीशिवाय आरोपींनी परस्पर फेरबदल केले आहेत. अशाप्रकारे फिर्यादी व इतर साक्षीदारांची १४ कोटी २० लाख ६ हजार ९३५ रुपयांची रक्कम दोन्ही डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी व तिच्या संचालकांनी अन्य कामाकरिता वापरली असून याप्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादींनी तक्रार अर्जात म्हटले आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी करीत आहेत. 

Web Title: Fourteen crores of fraud without the possession of a flat for eleven years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.