दौंडमध्ये विवाहितेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 01:14 PM2022-02-06T13:14:11+5:302022-02-06T13:14:29+5:30

पाच नराधामांच्या विरोधात तक्रार दाखल केल्या नंतर अवघ्या १२ तासांच्या आत हे आरोपी जेरबंद करण्यात यवत पोलिसांना यश आले होते

Fourteen days judicial custody for gang rapists in Daund | दौंडमध्ये विवाहितेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी

दौंडमध्ये विवाहितेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी

Next

खोर : खोर (ता.दौंड) येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकारणातील आरोपींना न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. खोर मध्ये शनिवार दि.२९ रोजी सायंकाळी साडे आठ ते अकराच्या सुमारास सामूहिक बलात्कार करण्याचा प्रकार घडला होता. या बाबत माहिती अशी की, खामगाव (ता. दौंड) येथे राहणाऱ्या एका विवाहितेवर खोर (ता.दौंड) येथील आरोपी अजय बापू चौधरी (वय २२), किरण रोहिदास चौधरी (वय २७), शंकर संपत चौधरी (वय २६), नवनाथ नाना कोकरे (वय ३२) सर्व राहणार खोर येथील असून संतोष भगवान चव्हाण (वय ३२ , रा. गिरीम, ता.दौंड) यांनी खोर परिसरातील इनामाच्या टेकड़ीवर नेऊन या महिलेवर सामूहिक बलात्कार केला होता. 

या महिलेने दिलेल्या जबाबा वरून या पाच नराधामांच्या विरोधात तक्रार दाखल केल्या नंतर अवघ्या १२ तासांच्या आत हे आरोपी जेरबंद करण्यात यवत पोलिसांना यश आले. या पाच आरोपीना सोमवार दि.३१ रोजी बारामती जिल्हा सत्र न्यायालया समोर हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने या पाच आरोपींना पाच दिवसांची (५ फेब्रुवारी पर्यंत) पोलीस कोठडी सुनावली गेली होती. त्यानंतर पोलीस कोठडी संपल्या नंतर या पाच आरोपींना शनिवार दि.५ रोजी बारामती जिल्हा सत्र न्यायालया समोर हजर केले असता आरोपींना तब्बल १४ दिवसाची न्यायालयनी कोठडी सुनावली गेली असल्याची माहिती यवत पोलिस स्टेशन माध्यमातून सांगण्यात आले आहे. पुढील तपास दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नारायण पवार करीत आहेत.

Web Title: Fourteen days judicial custody for gang rapists in Daund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.