चौदा वर्षांच्या मुलीचे लग्न दोन मुले असणाऱ्या पुरुषाशी; बोहल्यावर चढणार तेवढ्यात रोखला बालविवाह

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 10:37 AM2023-03-24T10:37:09+5:302023-03-24T10:37:35+5:30

आजारपणामुळे मेहनतीचे काम जमत नसल्याने आई जग सोडून गेलेल्या मुलीला बाप भीक मागून वाढवत होता

Fourteen year old girl married to a man with two children Child marriage was stopped when it was about to rise | चौदा वर्षांच्या मुलीचे लग्न दोन मुले असणाऱ्या पुरुषाशी; बोहल्यावर चढणार तेवढ्यात रोखला बालविवाह

चौदा वर्षांच्या मुलीचे लग्न दोन मुले असणाऱ्या पुरुषाशी; बोहल्यावर चढणार तेवढ्यात रोखला बालविवाह

googlenewsNext

वानवडी : वय वर्षे केवळ चौदा म्हणजे साधारण इयत्ता आठवी-नववीच्या वर्गात जाण्याचे वय; मात्र तिच्या भिकारी बापाने तिला थेट बोहल्यावर उभे केले आणि समोर नवरदेव मुलगा कोण, तर ज्याला आधीच दोन मुले आणि घटस्फोटित पत्नी. या गोष्टीची माहिती बालकल्याण समितीला मिळाली आणि त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन हा बालविवाह रोखला आणि मुलीला ताब्यात घेतले.

ही घटना गुरुवारी दुपारी आळंदी परिसरातील एका मंगल कार्यालयात घडली. वानवडी परिसरात राहणारी बबली (नाव बदललेले आहे) ही आताशी चौदा वर्षांची झालेली. ती वर्षाची असतानाच तिची आई जग सोडून गेली आणि बापाला फिट्सचा त्रास; त्यामुळे तो तेव्हापासून काम करायचा नाही. दिवसभर भीक मागून आणायचा ते खाऊनच त्याने या मुलीला वाढविलं आणि स्वत:ही जगला. स्वत:च्या आजारपणामुळे त्याला मेहनतीचे काम जमत नसल्याने त्याचे दुसरे लग्नही झालेले नाही; त्यामुळे या मुलीची जबाबदारी त्याच्यावर आली. मात्र भिकेतूनही पोट भरत नसल्याने त्याने अखेर या मुलीचे लग्न लावून देण्याचे ठरवले. मात्र अशी परिस्थिती असणाऱ्या मुलीशी लग्न तरी कोण करणार? त्यामुळे चांगल्या मुलाचे स्थळ तिला येईना. दुसरीकडे मुलगी तरुण होत चालली असल्याने तिच्या सुरक्षेचा प्रश्नही त्या बापाला सतावायला लागला. त्यामुळे अखेर त्याला तिच्यापेक्षा वयाने तिप्पट असलेला घटस्फोटित पुरुष सापडला. कहर म्हणजे त्याला याधीच तब्बल दोन मुले आहेत. त्यामुळे बबलीचे लग्न होताच त्या चौदा वर्षांच्या चिमुरडीला दोन लेकरं सांभाळायची जबाबदारी पडणार होती. तरीही लग्न ठरले, मुहूर्त निघाला आणि गुरुवारी दुपारी बबली बोहल्यावर चढणार तेवढ्यात तेथे पोलिस आणि बालकल्याण समितीचे अधिकारी पोहोचले आणि बबलीचा बालविवाह रोखला गेला.

समितीची तत्परता

चौदा वर्षे वयाच्या मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती बालन्याय मंडळ समितीच्या माजी सदस्या मनीषा पगडे आणि लक्ष्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पुंडे, कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष सचिन मथुरावाला यांना मिळाली होती. त्यांनी ती माहिती अध्यक्षा डॉ. राणी खेडीकर व सदस्य आनंद शिंदे, ॲड. पूर्वी जाधव, वैशाली गायकवाड व शामलता राव यांना दिली. त्यांनी वानवडी पोलिस ठाण्याला सूचना देऊन घटनेची खातरजमा केली. मुलीचा जन्मदाखला तपासला, त्यावरून ती चौदा वर्षांची असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ते तातडीने आळंदीत पोहोचले व त्यांनी हा बालविवाह रोखला व मुलीची सुरक्षित ठिकाणी रवानगी केली.

Web Title: Fourteen year old girl married to a man with two children Child marriage was stopped when it was about to rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.