Pune Fights Corona: शहरात सलग चौथ्या दिवशी कोरोनामुळे एकही मृत्यू नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 08:26 PM2021-11-01T20:26:28+5:302021-11-01T20:26:44+5:30
शहरात आजमितीला केवळ ८९ कोरोनाबाधितांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासत आहे
पुणे : शहरात सलग चौथ्या दिवशी १ नोव्हेंबरला एकाही (Corona Virus) कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही़. तर ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रथमच शंभरीच्या आत आली असून, आजमितीला केवळ ९७ कोरोनाबाधितांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासत आहे.
पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध तपासणी केंद्रांवर आज ४ हजार ९८ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये केवळ ४४ कोरोनाबाधित आढळून आले असून, तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी १.०७ टक्के आहे. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ६८६ इतकी असून, यापैकी ११७ जण गंभीर आहेत. शहरातील ८९ कोरोनाबाधितांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात गेल्या बारा दिवसात आठ दिवस एकही कोरोनाबधिताचा मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत शहरात ९ हजार ७४ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात आतापर्यंत ३५ लाख ५६ हजार १८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ५ लाख ४ हजार ३३० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ९४ हजार ५७० जण कोरोनामुक्त झाले आहे.