चौघांच्या पोलीस कोठडीत वाढ
By admin | Published: January 9, 2017 03:20 AM2017-01-09T03:20:47+5:302017-01-09T03:20:47+5:30
ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी तथा गोविंदाग्रज यांचा संभाजी उद्यानामधील पुतळा उखडणाऱ्या चौघांच्या पोलीस कोठडीत १० जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे़
पुणे : ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी तथा गोविंदाग्रज यांचा संभाजी उद्यानामधील पुतळा उखडणाऱ्या चौघांच्या पोलीस कोठडीत १० जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे़
प्रदीप भानुदास कणसे (वय २५, रा. रामोजी राणोजी बिल्डिंग, नऱ्हे आंबेगाव), हर्षवर्धन महादेव मगदूम (वय २३, रा. लक्ष्मी नारायण अपार्टमेंट, बालाजीनगर), स्वप्निल सूर्यकांत काळे (वय २४, रा. अलंकापूरम सोसायटी, वडमुखवाडी, चऱ्होली, आळंदी), गणेश देविदास कारले (वय २६, रा. चांदूस, रौंदळवस्ती, ता. खेड) अशी त्यांची नावे आहेत़
पोलिसांवर राजकीय दबाव असून, त्यांच्या दबावाखाली ते तपास करीत आहेत. आरोपींना राजकीय नावे घेण्यासाठी दबाव आणत असल्याचा अर्ज आरोपींच्या वतीने वकिलांनी न्यायालयात केला़
दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी़ के. नंदनवार यांनी १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली़ (प्रतिनिधी)
४चौघांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले़
४सरकारी वकील वामन कोळी यांनी सांगितले की, पुतळा, हातोडा, मोबाईल, गाडी जप्त करण्यात आली आहे़ या घटनेत आणखी कोण कोण सहभागी आहेत, त्यांचा तपास करायचा आहे़ त्यामुळे पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी केली़
४आरोपींच्या वतीने अॅड़ मिलिंद पवार, अॅड़ रविराज पवार, अॅड़ विश्वजित पाटील, अॅड़ भालचंद्र पवार यांनी आरोपींकडून आणखी काही जप्त करायचे नसल्याने पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचे सांगितले़