अकरावीची चौथी फेरी आजपासून सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 05:03 AM2018-08-03T05:03:16+5:302018-08-03T05:03:25+5:30

इयत्ता अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या चौथ्या फेरीची प्रक्रिया शुक्रवार (दि. ३) पासून सुरू होत आहे. या फेरीसाठी विद्यार्थ्यांना दि. ४ आॅगस्टपर्यंत आॅनलाइन अर्जाचा भाग १ व २ भरता येईल.

 The fourth round of eleventh to start from today | अकरावीची चौथी फेरी आजपासून सुरू

अकरावीची चौथी फेरी आजपासून सुरू

Next

पुणे : इयत्ता अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या चौथ्या फेरीची प्रक्रिया शुक्रवार (दि. ३) पासून सुरू होत आहे. या फेरीसाठी विद्यार्थ्यांना दि. ४ आॅगस्टपर्यंत आॅनलाइन अर्जाचा भाग १ व २ भरता येईल. दरम्यान, तिसऱ्या फेरीत ५ हजार ८०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, निवड झालेल्या ११ हजार ३५१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला नाही.
केंद्रीय प्रवेश समितीकडून राबविण्यात येत असलेल्या या प्रवेश प्रक्रियेत तिसºया फेरीत १७ हजार १५२ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली होती. तिसरी गुणवत्ता यादी दि. ३१ जुलैला जाहीर करण्यात आल्यानंतर, दि. २ आॅगस्टपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र, या मुदतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पाठ फिरविल्याचे दिसते. केवळ ५ हजार ८०१ विद्यार्थ्यांनी निवड झालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांनी मिळालेले महाविद्यालय अमान्य असल्याने पुढील फेरीसाठी प्रवेश घेण्याचे टाळले आहे. तर, ३४० विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केला असून, २५ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला.

चौथ्या फेरीसाठी ते पात्र ठरणार नाही
पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक होते. त्यामुळे संबंधित प्रवेश न घेतलेले विद्यार्थी चौथ्या फेरीत प्रवेशासाठी पात्र ठरणार नाहीत. उर्वरित विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीसाठी दि. ३ व ४ आॅगस्ट रोजी आॅनलाइन अर्जातील भाग १ व २ भरता येईल. त्यानंतर दि. ७ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता चौथी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती प्रभारी शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी दिली.

Web Title:  The fourth round of eleventh to start from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.