बिबट्याने केली चौथी शिकार; आंबेगावात धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 02:12 AM2018-12-15T02:12:45+5:302018-12-15T02:12:59+5:30

गोठ्यातल्या शेळीला केले ठार, गावात दहशत

The fourth victim of the leopard; Ambagate | बिबट्याने केली चौथी शिकार; आंबेगावात धुमाकूळ

बिबट्याने केली चौथी शिकार; आंबेगावात धुमाकूळ

googlenewsNext

मंचर : आंबेगाव तालुक्यातील वडगावात सध्या बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. गेल्या महिनाभरात तीन शेळ््या फस्त केलेल्या बिबट्याने आज पुन्हा एकदा गोठ्यात बांधलेल्या शेळीची शिकार केली आहे. त्यामुळे नागिरकांना रात्री घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे.

वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथील वायकरमळा परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. यावेळी येथील शेतकरी वसंत बुधाजी वायकर यांच्या गोठ्यातील शेळी या बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली. गेल्या आठवड्यातच एका मेंढपाळाची बकरी बिबट्याने फस्त केली होती. तरी अद्याप वनाधिकाऱ्यांकडून बिबट्याला पकडण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न केला जात नाही. सध्या वडगाव काशिंबेग परिसरात ऊसतोड सुरू आहे. त्यामुळे उसात लपून बसलेले बिबट्या, वाघ बाहेर पडत आहेत. अनेक वेळा या हिंस्र प्राण्याचे नागरिकांना प्रत्यक्ष दर्शन झाले असल्याने दिवसाढवळ््याही नागरिक शेताच्या आसपास फिरकण्यास घाबरत आहेत.

वायकरमळा येथील वसंत बुधाजी वायकर यांच्या घराशेजारी गोठ्यात बांधलेली शेळी बिबट्याने पहाटेच्यावेळी ओढून नेली. सकाळी वायकर बाहेर आल्यानंतर त्यांना गोठ्यात बांधलेली शेळी दिसली नाही. त्यामुळे गोठ्यात जाऊन पाहिल्यावर त्यांना शेळीच्या मांसाचा भाग व रक्त दिसले. बिबट्याने गोठ्यातच तिची शिकार करून तिला फरफटत नेल्याच्या खुणा दिसल्या. दरम्यान, वनखात्याचे कर्मचारी मोमीन, तसेच मदतनीस विठ्ठल भेके, डॉ. आर. जे. हांडे, आर. के. निघोट यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत शेळीचा पंचनामा केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय डोके, ग्रामस्थ हिरामण डोके, रामदास वायकर, शिवराम वायकर, रघुनाथ वायकर, शिवाजी गावडे उपस्थित होते.

पिंजरा लावण्याची मागणी
महिनाभरात बिबट्याने चार शेळ््या फस्त केल्या असल्यामुळे नागरिकांना दिवसाढवळ््या बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे शेताच्या कामावरही परिणाम झाला आहे. शेळीच्या हल्ल्यानंतरच येथील ग्रामस्थांनी वनखात्याकडे बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यास सांगितले होते. मात्र बिबट्या नाहीच, असा अंदाज वनखात्याने व्यक्त केला होता. मात्र काही नागरिकांना बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर त्याचे फोटो, व्हिडीओ काढून त्यांनी वनखात्याला दिले. सोशल मीडियावरही बिबट्याचा वावर व्हायरल झाला होता. मात्र तरीदेखील त्याला पकडण्यास वनखात्याकडून कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. हल्ला दररोजच रात्री वायरकमळा येथे रात्री बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज येत असल्याने या पिरसरातील नागरिक जीव मुठीत धरून राहत आहेत.

Web Title: The fourth victim of the leopard; Ambagate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.