पालघनने डोक्यात वार केल्याने कवटीला फ्रॅक्चर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 01:14 AM2019-03-04T01:14:34+5:302019-03-04T01:14:38+5:30

सोसायटीच्या दरवाजात गळाभेट घेऊन त्यानंतर दोघांनी एकाच्या डोक्यात पालघनने वार केला़

Fracture fracture in the head after violating it | पालघनने डोक्यात वार केल्याने कवटीला फ्रॅक्चर

पालघनने डोक्यात वार केल्याने कवटीला फ्रॅक्चर

Next

पुणे : सोसायटीच्या दरवाजात गळाभेट घेऊन त्यानंतर दोघांनी एकाच्या डोक्यात पालघनने वार केला़ हा वार इतका भीषण होता की त्यामुळे त्याच्या डोक्याच्या कवटीला फ्रॅक्चर झाले असून तो गंभीर जखमी आहे़ सचिन बाळासाहेब जागडे (रा़ साहिल आनंद सोसायटी, कामठे पाटीलनगर, कोंढवा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे़ कोंढवा पोलिसांनी शेखर लोखंडे आणि सुरेश बळीराम दयाळू (दोघे रा़ शेळकेवस्ती, अप्पर सुपर इंदिरानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ याप्रकरणी रिक्षाचालक शेखर लक्ष्मण आंबवले यांनी फिर्याद दिली आहे़ ही घटना कोंढव्यातील कामठे पाटीलनगर येथील साहिल आनंद सोसायटीसमोर रविवारी मध्यरात्री एकला घडली़
याबाबत पोलिसांनी सांगितले की, सचिन जागडे यांनी रिक्षाचालक शेख आंबवले यांना फोन करून निवांत हॉटेल येथे बोलावून घेतले व घरी जायचे आहे, असे सांगितले़ त्याच्या मोटारसायकलवरुन ते साहिल आनंद सोसायटीच्या गेटजवळ आले़ तेव्हा त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरुन दोघे जण आले़ त्यांनी सचिन जागडे यांची गळाभेट घेतली व काय भाऊ काय करतो, असे विचारले़ सचिन काही बोलणार तेवढ्यात दोघांनी त्यांच्याकडील पालघनने सचिन यांच्या डोक्यात व शरीरावर सपासप वार केले़
शेखर आंबवले हे त्यांना सोडविण्याचा प्रयत्न करु लागताच त्यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली़ या दोघांनी सचिन जागडे यांच्या डोक्यात इतक्या जोरात वार केले की त्यात त्यांच्या डोक्याच्या कवटीला फ्रॅक्चर झाले आहे़ त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत़
सचिन जागडे हे बोलू शकत नसल्याने या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही़ शेखर लोखंडे व सुरेश दयाळू हे पळून गेले असून कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत़

Web Title: Fracture fracture in the head after violating it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.