निमगाव खंडोबा येथील देवाच्या मूर्तीला सुगंधी फुलाची सजावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:07 AM2021-07-24T04:07:49+5:302021-07-24T04:07:49+5:30
निमगाव येथील खंडोबा मंदिर राज्यात प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो भाविक देवाच्या दर्शनासाठी येत असतात. सध्या कोरोनाचा काळ असल्याने मंदिरे ...
निमगाव येथील खंडोबा मंदिर राज्यात प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो भाविक देवाच्या दर्शनासाठी येत असतात. सध्या कोरोनाचा काळ असल्याने मंदिरे बंद आहेत. गुरुपौर्णिमेनिमित्त यंदा पहिल्यांदाच खंडोबा देवाची मूर्ती, म्हाळसा, भानू यांच्या मूर्तीला मोगरा, गुलाब, जुई, जबेरा, चोनचाफा, शेंवती, अस्टर, झेंडू या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच देवासमोरील पिंडीलाही फुलांची सजावट करण्यात आली होती. मंदिराच्या संपूर्ण गाभाऱ्याला फुलांची सजावट केल्यामुळे भाविकांनी सजावट व दर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती. ही सजावट जेजुरी कडेपठारचे पुजारी नीलेश बारभाई, देवाचे गुरव भगवान भगत, चंद्रकांत भगत, राजू भगत, रुस्तुभाई पठाण, मानसी भगत, अथर्व भगत, सिद्धेश भगत व विशाल गुरव यांनी मदत केली. या वेळी खंडोबा देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष बबनराव शिंदे, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, माजी सरपंच अमर शिंदे, पुजारी योगेश गुरव व ग्रामस्थ उपस्थित होते.
निमगाव (ता. खेड) येथे मंदिरात खंडोबा देवाच्या मूर्तीला गुरुपाैर्णिमेनिमित्त आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती.