बेकायदेशीर शेतजमिनीची खरेदी करून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:10 AM2021-03-01T04:10:55+5:302021-03-01T04:10:55+5:30

सोमवार (दि. २२) रोजी गट नंबर ३९५ मधील बेकायदेशीर जमिनीची मोजणी मागवण्यात आली होती. वडील नथू मारुती पारठे ...

Fraud by buying illegal farmland | बेकायदेशीर शेतजमिनीची खरेदी करून फसवणूक

बेकायदेशीर शेतजमिनीची खरेदी करून फसवणूक

Next

सोमवार (दि. २२) रोजी गट नंबर ३९५ मधील बेकायदेशीर जमिनीची मोजणी मागवण्यात आली होती. वडील नथू मारुती पारठे यांना मोजणी हरकत घेण्याची सूचना दिली होती. परंतु मन्नान नूरमहंमद शेख यांनी मोजणीच्या दिवशी वडिलांना हाॅटेलवर नेऊन दारूच्या नशेत ठेवले. त्यांना मोजणीच्या ठिकाणी उपस्थित राहता आले नाही. तर रामू भागू पारठे ,लक्ष्मण भागू पारठे ,महादू भागू पारठे यांनी जमीन मोजणीस हरकत देऊन या संदर्भात कोर्टात केस सुरू असल्याने मोजणी थांबवली.

याच राग आल्यामुळे शेख यांच्या मुलांनी चिडलेल्या अवस्थेत आई संजना नथू पारठे यांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकाराने अपमानिक झालेल्या संजना पारठे यांनी मंगळवार (दि. २३) रोजी पहाटेच्या वेळी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. असल्याचे हर्षद पारठे ,अशोक पारठे यांनी भोर पोलिसांत दिलेल्या तक्रारी नमूद केले आहे.

Web Title: Fraud by buying illegal farmland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.