ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्राची मतद घेतल्यास फसवणूक टाळता येईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:07 AM2021-01-01T04:07:00+5:302021-01-01T04:07:00+5:30
-- नारायणगाव : ग्राहकाची अज्ञानातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहून ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्राची मदत नागरिकांनी घ्यावी असे आवाहन ...
--
नारायणगाव : ग्राहकाची अज्ञानातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहून ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्राची मदत नागरिकांनी घ्यावी असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नारायणगाव येथे केले .
अखिल भारतीय ग्राहक पंचायत जुन्नर तालुका यांच्या वतीने आयोजित नारायणगाव येथे ग्राहक जागरण मेळावा व ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्राचे उद्घाटन प्रसंगी शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे बोलत होते , यावेळी जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्र कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले . याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब औटी, मार्गदर्शक ॲड. तुषार झेंडे, प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच योगेश उर्फ बाबूभाऊ पाटे, नारखेडे साहेब, देवरामशेठ तट्टू, वैशाली आडसरे, भास्कर आहेर, गोरक्ष लामखाडे, कौत्सल्या फापाळे, शैलेश कुलकर्णी, शांताराम हिंगे, रमेश कोल्हे, रोहिदास केदारी, गणेश वाजगे, अजित वाजगे, पराग हांडे आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार बेनके म्हणाले की, ग्रामीण भागातील गरीब व शेतकरी कुटुंबाने कष्ट करून आयुष्यभर जमा केलेल्या पुंजीची फसवणूक झाल्यास ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी निश्चित फायदा होईल.
अ. भा. ग्राहक पंचायतचे प्रांत संघटक मंत्री बाळासाहेब औटी म्हणाले कि , केंद्र सरकारने २०१० साली वैद्यकीय अस्थापना कायदा अनेक राज्यात व केंद्रशासित प्रदेशात लागू केलेला आहे. २०१४ ला महाराष्ट्र सरकारने मसुदा तयार केला परंतु ग्राहकांच्या हिताचा हा कायदा अस्तित्वात आला नाही. तसेच उत्पादित मालावर उत्पादन मूल्य छापण्यात यावे तसा कायदा संसदेत आणला पाहिजे यासाठी लोकप्रतिनिधींनी संसदेत मागणी करावी असे विचार व्यक्त केले.
यावेळी ॲड. तुषार झेंडे यांनी ग्राहकांचे अधिकार समजावून सांगितले व ग्राहकाने आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यास ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून त्याची सोडवणूक करण्यात येईल अशी हमी दिली .
--
फोटो : ३१नारायणगाव ग्राहक जागरण मेळावा
फोटो : नारायणगाव येथे ग्राहक जागरण मेळावा व ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्राचे उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना खा. डॉ. अमोल कोल्हे .
--