जस्ट डायलकडून मिळालेल्या क्रमांकावरून फसवणूक, भरपाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:11 AM2021-04-14T04:11:12+5:302021-04-14T04:11:12+5:30

आयोगाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्य संगीता देशमुख आणि क्षितिजा कुलकर्णी यांनी दिला आहे. याबरोबरच तक्रारदारांना मानसिक व शारीरिक त्रास ...

Fraud, compensation orders from numbers obtained from Just Dial | जस्ट डायलकडून मिळालेल्या क्रमांकावरून फसवणूक, भरपाईचे आदेश

जस्ट डायलकडून मिळालेल्या क्रमांकावरून फसवणूक, भरपाईचे आदेश

Next

आयोगाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्य संगीता देशमुख आणि क्षितिजा कुलकर्णी यांनी दिला आहे. याबरोबरच तक्रारदारांना मानसिक व शारीरिक त्रास आणि तक्रार खर्चापोटी पाच हजार रुपये देण्यात यावेत, असेही आदेशात नमूद आहे.

याबाबत गजानन दत्तात्रेय एकबोटे (रा. दांडेकर पूल) यांनी जस्ट डायल कंपनी लिमिटेड विरोधात आयोगात तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी २८ सप्टेंबर २०२० रोजी जस्ट डायलच्या क्रमांकावर फोन करून रिक्षा चालविण्यासाठी ओला कंपनीचा नंबर व माहिती मागवली. त्यानंतर लगेचच त्यांच्या व्हॉट्सअॅपवर ओला कंपनीची माहिती आणि मोबाइल नंबर आला. त्या नंबरवर तक्रारदार यांनी फोन केला. त्या वेळी समोरील व्यक्तीने त्यांच्याकडून बँक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर आलेला ओटीपी त्यांनी संबंधित व्यक्तीला पाठवला. ओटीपी सांगितल्यानंतर काही वेळातच तक्रारदार यांच्या खात्यातून सुरुवातीला पाच व नंतर तीन असे आठ हजार रुपये वजा झाले. जस्ट डायलने दिलेल्या नंबरवर फोन केल्याने व त्यांना पुरविलेल्या माहितीमुळे आठ हजार रुपये बँक खात्यातून कमी झाल्याने नुकसानभरपाई मिळावी म्हणून तक्रारदारांनी आयोगात तक्रार दाखल केली होती. याबाबत नोटीस मिळाल्यानंतरही जस्ट डायलकडून कोणी आयोगात हजर झाले नाही. त्यामुळे एकतर्फी आदेश देण्यात आला.

Web Title: Fraud, compensation orders from numbers obtained from Just Dial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.