कमी वजनाचा सिलिंडर देऊन फसवणूक

By admin | Published: May 8, 2016 03:30 AM2016-05-08T03:30:08+5:302016-05-08T03:30:08+5:30

वैधमापन शास्त्र विभागाने पुणे जिल्ह्यात केलेल्या धडक तपासणी मोहिमेत ठरलेल्या वजनापेक्षा कमी वजनाचे गॅस सिलिंडर देणे, वजन करण्याची उपकरणे कामगारांकडे नसणे

Fraud by giving a low-weight cylinder | कमी वजनाचा सिलिंडर देऊन फसवणूक

कमी वजनाचा सिलिंडर देऊन फसवणूक

Next

पुणे : वैधमापन शास्त्र विभागाने पुणे जिल्ह्यात केलेल्या धडक तपासणी मोहिमेत ठरलेल्या वजनापेक्षा कमी वजनाचे गॅस सिलिंडर देणे, वजन करण्याची उपकरणे कामगारांकडे नसणे, पडताळणी न केलेली वजन उपकरणे वापरणे, अशी प्रकरणे समोर आली. यामध्ये फसवणूक करणाऱ्या ७१ जणांवर खटले भरण्यात आले आहेत. गॅस सिलिंडरचे वितरण करताना त्यातून गॅस काढला जातो. कमी वजनाचे सिलेंडर ग्राहकांना दिले जातात. सिलेंडरचे घरी जाऊन वितरण करताना ग्राहकाने मागणी केल्यास वजन काटयावर सिलेंडरचे वजन दाखविणे सक्तीचे असतानाही ते करून न देणे अशा अनेक तक्रारी वैध मापन शास्त्र विभागाकडे येत होत्या. त्याची दखल घेत वैध मापन शास्त्र विभागाने पुणे जिल्ह्यात एलपीजी गॅस वितरकांची विशेष तपासणी मोहिम राबविली. (प्रतिनिधी)

वैधमापन शास्त्र कायद्यांतर्गत आणि आवेष्टित वस्तू नियमांतर्गत ७१ खटले नोंदविण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने ५० किलोग्रॅम क्षमतेची तोलन उपकरणे डिलिव्हरीसाठी ग्राहकांना उपलब्ध करून न देणे, विहित मुदतीत पडताळणी व मुद्रांकन करून न घेता तोलन उपकरणे वापरणे, या स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्यात आले. वितरणासाठी उपलब्ध असलेल्या गॅस सिलिंडरची निव्वळ वजनासाठी तपासणी करण्यात आली.

Web Title: Fraud by giving a low-weight cylinder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.