नोकरीच्या आमिषाने माजी लेफ्टनंट कर्नल महिलेची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 19:03 IST2018-04-20T19:03:26+5:302018-04-20T19:03:26+5:30
बिर्ला हॉस्पिटलमध्ये सुरक्षा अधिका-याच्या नोकरीच्या आमिषाने लष्करातील माजी लेफ्टनंट कर्नल महिलेची १ लाख ६७० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

नोकरीच्या आमिषाने माजी लेफ्टनंट कर्नल महिलेची फसवणूक
पुणे : नोकरीच्या आमिषाने लष्करातील माजी लेफ्टनंट कर्नल महिलेची १ लाख ६७० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींविरुध्द कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मालती राव. एस. (वय ६२, रा. एनआयबीएमरोड, कोंढवा) या लष्करातील निवृत्त अधिकारी आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी नोकरी डॉट कॉम या वेबसाईटवर नोकरीसाठी बायोडेटा अपलोड केला होता. त्यानंतर त्यांना एकाने कॉलकरून तुम्हाला बिर्ला हॉस्पिटलमध्ये सुरक्षा अधिका-याची नोकरी उपलब्ध असल्याचे सांगितले. त्यासाठी अर्ज व इतर प्रोसेसिंग शुल्क म्हणून त्यांच्याकडून पेटीयमद्वारे ५ ते ८ डिसेंबर २०१७ दरम्यान १ लाख ६७० रुपये घेतले. पैसे घेऊनही नोकरी न दिल्याने फसवणूक झाल्याचे मालती राव यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुदाम पाचोरकर तपास करत आहेत.