पालिकेत नोकरीच्या आमिषाने फसवणूक

By admin | Published: October 14, 2016 04:50 AM2016-10-14T04:50:29+5:302016-10-14T04:50:29+5:30

महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एकाला अटक

Fraud with job bribe in the corporation | पालिकेत नोकरीच्या आमिषाने फसवणूक

पालिकेत नोकरीच्या आमिषाने फसवणूक

Next

पुणे : महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एकाला अटक केली.
अर्जुन एकनाथ घुले (वय ६५, रा. रविवार पेठ) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी आणखी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विकी राजाराम वाघ (वय २५, रा. खानापूर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना डिसेंबर २०१३ ते मार्च २०१४ या कालावधीत घडली.
अर्जुन घुले आणि त्याच्या साथीदाराने विकी वाघ आणि त्यांच्या मित्रांना महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी त्यांनी वाघ आणि त्याच्या ९ मित्रांकडून प्रत्येकी१ लाख ८० हजार, असे एकूण १८ लाख रुपये घेतले. मात्र, नोकरी न देता त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी अर्जुन घुले याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्या साथीदाराला अटक करायची आहे. त्याच्याकडून रक्कम जप्त करायची असल्याने त्याला पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकिलांनी केली. त्याला १५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Fraud with job bribe in the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.