शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याच्या आमिषाने ९५ हजारांना गंडा; चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 06:29 PM2021-03-25T18:29:20+5:302021-03-25T18:30:03+5:30
फिर्यादीला शेअर मार्केटमध्ये जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले.
पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास जादा नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने ९५ हजार रुपयांची फसवणूकीचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगरपोलिसांनी दोघाविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी मुकेश सोमवंशी (वय २३, रा. खराडी) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार १७ ऑक्टोंबर ते ५ नोव्हेंबर २०२० दरम्यान घडला.
आशिष असे नाव सांगणाऱ्या आरोपीने फिर्यादी यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर त्यांनी एका खात्यात पैसे भरायला सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी यांनी ९५ हजार ५०० रुपये भरले. मात्र ठरल्याप्रमाणे त्यांना कोणताही नफा मिळाला नाही. तसेच त्यांचे पैसेही परत न करता फसवणूक केली.