पोलीस दलात नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:08 AM2020-12-23T04:08:10+5:302020-12-23T04:08:10+5:30
पुणे : पोलीस असल्याची बतावणी करीत, पोलीस दलात मुलाला नोकरी लावण्याच्या आमिषाने महिलेकडून पैसे उकळणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली. ...
पुणे : पोलीस असल्याची बतावणी करीत, पोलीस दलात मुलाला नोकरी लावण्याच्या आमिषाने महिलेकडून पैसे उकळणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली.
सुरेश इश्वर पेडणेकर (वय ३६,रा. भांडुप, मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार महिला आणि आरोपी पेडणेकरची एका परिचिताच्या माध्यमातून ओळख झाली होती. पेडणेकरने महिलेकडे पोलीस असल्याची बतावणी केली होती. महिलेच्या मुलाला पोलीस दलात नोकरी लावण्याचे आमिष दीड वर्षांपूर्वी दाखविले होते. महिलेला पेडणेकरने जिल्हा परिषदेजवळील एका उपहारगृहात बोलावून घेतले. महिलेकडून त्याने ८० हजार रुपये घेतले. त्यानंतर महिलेने नोकरीबाबत विचारणा केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. महिलेने पाठपुरावा सुरू ठेवल्याने त्याने महिलेला १२ हजार रुपये परत केले. अखेर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पेडणेकरला अटक केली.