शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांना गंडा; बिबवेवाडी पोलिसांनी केली एकाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 08:05 PM2021-06-23T20:05:58+5:302021-06-23T20:08:09+5:30

बिबवेवाडी, तळेगाव दाभाडे, पिंपरी, नाशिकमधील अनेकांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न

Fraud with many people by the lure of investing in the stock market; Bibwewadi police arrested one | शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांना गंडा; बिबवेवाडी पोलिसांनी केली एकाला अटक 

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांना गंडा; बिबवेवाडी पोलिसांनी केली एकाला अटक 

googlenewsNext

पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांना गंडा घालणार्‍यास बिबवेवाडी पोलिसांनीअटक केली आहे.

लक्ष्मण हरिभाऊ जोरी (रा. गोर्‍हे बुद्रुक, ता. हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याने बिबवेवाडी, तळेगाव दाभाडे, पिंपरी, नाशिकमधील अनेकांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. जोरीने शेअर बाजारात गुंतवणुकीबाबत जाहीरात केली होती. एक लाख रुपये गुंतवल्यास दिवसाला दोन ते पाच हजार रुपये नफा मिळवा, असे आमिष त्याने जाहिरातीद्वारे दाखविले होते. बिबवेवाडी भागातील एका तक्रारदाराची त्याने फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. गेले वर्षभर तो पोलिसांना गुंगारा देत होता.

बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर यांना मिळालेल्या माहितीवरुन पोलीस अंमलदार सतिश मोरे यांनी तांत्रिक विश्लेषण करुन हवेली तालुक्यातील गोर्‍हे बुद्रुक येथे जाऊन सापळा लावून स्थानिकांच्या मदतीने लक्ष्मण जोरी याला पकडले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असताना त्याने संपूर्ण महाराष्ट्रात शेकडो लोकांना करोडो रुपयांचा गंडा घातल्याचे कबूल केले.

पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, गुन्हे शाखेच्या निरीक्षक अनिता हिवरकर, उसगावकर, अमित पुजारी, सतीश मोरे, तानाजी सागर, श्रीकांत कुलकर्णी आदींनी ही कारवाई केली.
.........
 जोरी सध्या येरवडा कारागृहात असून त्याने अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. ज्यांची फसवणूक झाली असेल, त्यांनी नजिकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बिबवेवाडी पोलिसांनी केले आहे.

Web Title: Fraud with many people by the lure of investing in the stock market; Bibwewadi police arrested one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.