विम्याचे पैसे आल्याचे सांगत १३ लाखांची फसवणूक; मावळ तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 09:38 PM2023-07-25T21:38:26+5:302023-07-25T21:40:02+5:30

सेवानिवृत्त व्यक्तीची १३ लाख १६ हजारांची फसवणूक केली...

Fraud of 13 lakhs claiming that insurance money has arrived; Incidents in Maval Taluk | विम्याचे पैसे आल्याचे सांगत १३ लाखांची फसवणूक; मावळ तालुक्यातील घटना

विम्याचे पैसे आल्याचे सांगत १३ लाखांची फसवणूक; मावळ तालुक्यातील घटना

googlenewsNext

पिंपरी : विम्याचे पैसे आले असून, त्यासाठी अगोदर काही रक्कम भरावी लागेल, असे सांगत एका सेवानिवृत्त व्यक्तीची १३ लाख १६ हजारांची फसवणूक केली. मावळ तालुक्यातील वारंगवाडी येथे दि. २० मे ते २० जुलै या कालावधीत हा प्रकार घडला.

सुभाषचंद्र कुणतीया आणि एक महिला यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ६६ वर्षीय व्यक्तीने तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मिलिटरी इंजिनिअरिंग सेवेत नोकरी करीत होते. ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना दि. २० मे रोजी आरोपींनी फोन करून त्यांचे विम्याचे ८२ लाख ५० हजार ९१० रुपये आले असल्याचे सांगितले. हे पैसे मिळविण्यासाठी विमा फी, कर आणि टीडीएस अशा वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे भरण्यास सांगितले.

फिर्यादीने त्यासाठी एकूण १३ लाख १६ हजार ९९५ रुपये भरले. मात्र त्यांच्या बँक खात्यात कोणतीही विमा रक्कम जमा झाली नाही. तसेच आरोपींनी फिर्यादीचे पैसेही परत केले नाहीत, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Fraud of 13 lakhs claiming that insurance money has arrived; Incidents in Maval Taluk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.