पार्सलमध्ये ड्रग्स असल्याचे सांगून दोघांची ३१ लाखांची फसवणूक, पुण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 09:56 AM2023-12-08T09:56:34+5:302023-12-08T10:02:11+5:30

पहिल्या घटनेमध्ये सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला अज्ञाताने २ नोव्हेंबर २०२३ रोजी संपर्क साधला...

Fraud of 31 lakhs by two saying that there are drugs in the parcel, an incident in Pune | पार्सलमध्ये ड्रग्स असल्याचे सांगून दोघांची ३१ लाखांची फसवणूक, पुण्यातील घटना

पार्सलमध्ये ड्रग्स असल्याचे सांगून दोघांची ३१ लाखांची फसवणूक, पुण्यातील घटना

पुणे : मुंबई क्राइम ब्रांच ऑफिसर बोलत असल्याचे भासवून तुम्ही पाठवलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडले आहेत, असे सांगून फसवणूक केल्याच्या दोन घटना येरवडा आणि सिंहगड रोड परिसरात घडल्या आहेत. तुम्ही पाठवलेल्या पार्सलमध्ये बेकायदेशीर अमली पदार्थ सापडले आहे, असे सांगून सायबर चोरट्यांनी दोघांना तब्बल ३१ लाख २१ हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर करून घेतले आहेत.

पहिल्या घटनेमध्ये सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला अज्ञाताने २ नोव्हेंबर २०२३ रोजी संपर्क साधला. तुमच्या नावाने मुंबई ते तैवान पार्सल पाठवले आहे, त्यामध्ये अमली पदार्थ आहे. सायबर क्राइम मुंबईमधून हर्षवर्धन नावाचे अधिकारी बोलत असल्याचे भासवून बँक खाते व्हेरिफाय करावे लागेल असे सांगितले. त्यासाठी एक लिंक पाठवली. लिंकवर क्लिक केल्याने सायबर चोरट्यांना फिर्यादींच्या मोबाइलचा रिमोट ॲक्सेस मिळाला आणि २७ लाख ९८ हजार रुपये परस्पर ट्रान्सफर करून घेण्यात आले.

दुसऱ्या घटनेमध्ये, येरवडा परिसरात राहणाऱ्या एकाने फिर्याद दिली आहे. मुंबई येथून थायलंडला तुमच्या नावे पार्सल पाठवले आहे. त्यामध्ये अमली पदार्थ असल्याने अटक होईल अशी भीती दाखवली. मुंबई क्राइम ब्रांच ऑफिसर नरेश गुप्ता बॅनर्जी बोलत असल्याचे सांगून खोटी कागदपत्रे पाठवली. त्यानंतर केस क्लिअर करून देतो, असे सांगत एनओसी सर्टिफिकेटसाठी ३ लाख २६ हजार रुपये पाठवण्यास भाग पडले.

अशी घ्या काळजी?

- तुम्ही पार्सल पाठवले नसल्यास घाबरू नका.

- असा फोन आल्यास सर्वांत आधी सायबर पोलिसांना कळवा.

- कोणतेही ॲप्लिकेशन डाऊनलोड करू नये.

- कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये.

Web Title: Fraud of 31 lakhs by two saying that there are drugs in the parcel, an incident in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.