Pune: हलक्या दर्जाचे हिरे विकून साडेतीन कोटींची फसवणूक; तनिष्कच्या मुख्य सेल्समनला अटक

By विवेक भुसे | Published: July 5, 2023 11:52 AM2023-07-05T11:52:22+5:302023-07-05T11:54:35+5:30

याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मुख्य सेल्समनला अटक केली आहे....

Fraud of 3.5 crores from a reputed diamond jewelery showroom; Tanishq's chief salesman arrested | Pune: हलक्या दर्जाचे हिरे विकून साडेतीन कोटींची फसवणूक; तनिष्कच्या मुख्य सेल्समनला अटक

Pune: हलक्या दर्जाचे हिरे विकून साडेतीन कोटींची फसवणूक; तनिष्कच्या मुख्य सेल्समनला अटक

googlenewsNext

पुणे : हिरा है सदा के लिए, असे म्हणणार्‍या आणि हिर्‍याच्या दागिन्यांना लोकामध्ये लोकप्रिय बनवून देणार्‍या नामवंत तनिष्क कंपनीतील शो रुममध्ये एका महिलेची तब्बल ३ कोटी ४८ लाख ८५ हजार ९९७ रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मुख्य सेल्समनला अटक केली आहे.

याबाबत लोणी काळभोर येथील एका ४६ वर्षाच्या महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चेतन विसपुते याला अटक करण्यात आली असून संगिता महाजन, तेजल पवार, अमोल मोहिते, सागर धोंडे, चंदन गुप्ता, धवल महेता, हितेश पुनामिया अशा ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी सांगितले की, फिर्यादी यांचे पेट्रोल पंप व इतर व्यवसाय आहेत. त्यातून मिळणार्‍या पैशांमधून त्यांनी डिसेबर २०१८ पासून तनिष्कच्या लक्ष्मी रोडवरील शोरुममधून वेळोवेळी ४ कोटी १९ लाख रुपयांचे हिर्‍यांचे दागिने खरेदी केले होते. यावेळी त्या नेहमीच्या ग्राहक असल्याने त्यांनी डिस्काऊंट मागितल्यावर तेथील मॅनेजर, कॅशिअर यांनी त्यांना डिस्काऊंट दिला होता.

दरम्यान, या दागिन्यांबाबत त्यांनी जानेवारी २०२३ मध्ये शो रुममध्ये चौकशी केली. जुने दागिने बदलायचे असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांना टाळाटाळ करण्यात आली. मुख्य सेल्समन चेतन विसपुते याला त्यांनी फोन केले. तेव्हा त्याने फोन घेणे बंद केले. त्यामुळे त्यांना संशय आला. तेव्हा त्यांनी तनिष्कच्या दुसर्‍या शो रुममध्ये हे हिर्‍याचे दागिने दाखविले. त्या शो रुममधून त्यांच्याकडील हिर्‍याचे दागिने हे प्रत्यक्षात अत्यंत हलक्या दर्जाचे असल्याचे सांगण्यात आले. त्यांना कमी किंमतीचे हिर्‍याचे दागिने जास्त किंमतीत दिले. जादा रक्कमेचे बनावट बिल तयार करुन त्यावर तनिष्कचे शिक्के मारुन डिस्काऊंट दिल्याचे भासविले.

जादा रक्कमेची बिले देऊन ३ कोटी ४८ लाख ८५ हजार ९९७ रुपयांची फसवणूक केली. शो रुममधील मॅनेजर, कॅशिअर, बिझनेस मॅनेजर आणि मालक यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल करुन मुख्य सेल्समनला अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर तपास करीत आहेत.

Web Title: Fraud of 3.5 crores from a reputed diamond jewelery showroom; Tanishq's chief salesman arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.