नोकरीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक; शिक्षण विभागातील अधिकारी शैलजा दराडेला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 06:28 AM2023-08-08T06:28:23+5:302023-08-08T06:28:31+5:30
गुन्हा दाखल झाल्यानंतर शैलजा दराडेने पुण्यातील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नोकरीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिक्षण विभागातील मोठ्या पदावर असलेल्या शैलजा दराडे या महिलेला पोलिसांनी सोमवारी अटक केली. यापूर्वी शिक्षण विभागात पैशांच्या बदल्यात नोकरीचे आमिष दाखवल्याने तिचे निलंबन करण्यात आले होते. शैलजा दराडेने राज्याच्या शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पैसे घेतले, मात्र नोकरी न लावता फसवणूक केली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर शैलजा दराडेने पुण्यातील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळला. राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी राज्य सरकारला या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल दिला होता.
२७ लाख घेतले
n फिर्यादी सूर्यवंशी हे शिक्षक आहेत. त्यांच्या नात्यातील एका महिलेला शिक्षक पदावर नोकरी हवी होती. त्यांची दादासाहेब दराडे याच्याशी ओळख झाली. त्याने बहीण शैलजा शिक्षण विभागात अधिकारी असल्याचे सांगितले.
n दोन नातेवाईक महिलांना शिक्षक पदावर नोकरी लावतो, असे आमिष दाखवून त्या बदल्यात त्याने २७ लाख रुपये घेतले.
n शैलजा दराडे ही महिला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या प्रभारी आयुक्त या पदावर कार्यरत होती.
n हडपसर पोलिस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या विभागातून निलंबित करण्यात आले होते.
n नोकरी लावण्याचे आमिष दाखवून शैलजा दराडे आणि तिचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे या दोघांनी फसवणूक करत, १२ ते १४ लाख रुपये घेऊन ४४ जणांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले होते.