सायबर चोरट्यांकडून प्राध्यापक महिलेची दीड कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल
By भाग्यश्री गिलडा | Updated: May 23, 2024 16:42 IST2024-05-23T16:41:00+5:302024-05-23T16:42:57+5:30
याप्रकरणी बुधवारी (दि. २२) अनोळखी व्यक्तीवर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर चोरट्यांकडून प्राध्यापक महिलेची दीड कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल
भाग्यश्री गिलडा, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : सायबर चोरट्याने पोलीस असल्याची बतावणी करून औंध येथील प्राध्यापक महिलेची तब्बल १ कोटी ५२ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी (दि. २२) अनोळखी व्यक्तीवर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. याबाबत औंध रस्ता परिसरात राहणाऱ्या एका ४३ वर्षीय प्राध्यापक महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना २ एप्रिल ते २२ मे २०२४ या दरम्यानच्या काळात घडली आहे. सायबर चोरट्यांनी प्राध्यापक महिलेशी संपर्क साधला. पोलीस बोलत असल्याचे सांगितले. तसेच तुमच्या आधारकार्ड चा वापर करुन बेकायदेशीर कामे सुरु असल्याचे सांगितले. पोलिसांची कारवाई होईल आणि अटक होण्याची भीती दाखवली. त्यानंतर फिर्यादी यांना वेगवेगळ्या बँक खात्यात १ कोटी ५२ लाख ४५ हजार ७६० रुपये पाठवण्यास भाग पडून फसवणूक केल्याचे फिर्यादेत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे करत आहेत.