चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी पैसे घेऊन निर्मातीची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:09 AM2021-01-15T04:09:42+5:302021-01-15T04:09:42+5:30
पुणे : माचीवरला ‘बुधा’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी महिलेकडून ४५ लाख रुपये घेऊन निर्मातीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला ...
पुणे : माचीवरला ‘बुधा’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी महिलेकडून ४५ लाख रुपये घेऊन निर्मातीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी विजय तुकाराम लोळे, दीपिका विजय लोळे (रा.मांजरी, हडपसर) आणि विजयदत्त फिल्म यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत योगिनी मकरंद आडकर (वय ५८, रा. बोट क्लब रोड) यांनी फिर्याद दिली आहे. विजय व दीपिका लोळे यांनी आडकर यांना त्यांची विजयदत्त फिल्म निर्मिती कंपनी असल्याचे सांगितले. त्यांना आर्थिक पाठबळ मिळविण्यासाठी त्यांनी स्वत:ची खोटी प्रतिमा निर्माण केली. माचीवरला ‘बुधा’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी आडकर यांच्याकडून ४५ लाख रुपये २०१७ मध्ये घेतले. त्या मोबदल्यात फिर्यादी यांना कोणताही हिशोब व परतावा न देता फिर्यादी यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक शेंडगे अधिक तपास करीत आहेत.