कॅशबॅकच्या बहाण्याने १४ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:08 AM2021-06-27T04:08:38+5:302021-06-27T04:08:38+5:30
पुणे : कॅशबॅकचे प्रलोभन दाखवत एका व्यक्तीला दाम्पत्याने १४ लाख ४ हजार ६३१ रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचे उघडकीस आले ...
पुणे : कॅशबॅकचे प्रलोभन दाखवत एका व्यक्तीला दाम्पत्याने १४ लाख ४ हजार ६३१ रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. त्यामध्ये ६ लाख ३० हजारांची मुद्दल व ७ लाख ७४ हजार ६३१ रुपये कॅशबॅकने होणारी रक्कम असा दोन्हीचा समावेश आहे.
याप्रकरणी, सोपान भाऊसाहेब येवले (वय ३५,रा.केसनंदर रोड वाघोली) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुर्गा परमनंद उर्फ ममता ओम सावरिया व ओम सावरिया (रा. नगर पुणे रोड वाघोली) या दाम्पत्याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. ही घटना ३१ डिसेंबर २०१९ ते १४ फेब्रुवारी २०२० या कालावधीत घडली आहे. दरम्यान आरोपींनी फिर्यादींना वस्तू खरेदी केल्यानंतर कॅशबॅकची रक्कम पुढील चार महिन्यांच्या तारखा टाकून धनादेश दिले होते. मात्र काही दिवसानंतरच दोघांनी दुकानाचा गाशा गुंडाळून पळ काढला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुढील तपास सहायक पोलिस फौजदार दीपक जाधव करीत आहेत.
----------------------------------