व्यवसायात भागीदारीच्या आमिषाने १७ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:14 AM2021-01-19T04:14:39+5:302021-01-19T04:14:39+5:30
पुणे : व्यवसायात भागीदारीच्या आमिषाने एकाची १७ लाख ६२ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सिंहगड रोड ...
पुणे : व्यवसायात भागीदारीच्या आमिषाने एकाची १७ लाख ६२ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सिंहगड रोड पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
जिलेन साबीर पाशा, अक्षया अशोक निवळकर (दोघे रा. पनवेल, नवी मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अभिजीत दिलीप उभे (वय ३१, रा. धायरी, सिंहगड रोड) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जानेवारी २०१९ ते जुलै २०२० दरम्यान घडला. पाशा आणि निवळकर यांनी द रॉक इव्हेंट मॅनेजमेंट या नावाने व्यवसाय सुरू केला होता. उभे यांची आरोपींबरोबर परिचितामार्फत ओळख झाली होती. दोघांनी उभे यांना व्यवसायात गुंतवणूक केल्यास ४० टक्के भागीदारी देण्याचे आमिष दाखविले होते. गेल्या वर्षी त्यांच्याकडून वेळोवेळी १७ लाख ६२ हजार रुपये घेण्यात आले होते. उभे यांना कोणत्याही प्रकारचा परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक उमरे तपास करत आहेत.