ब्लॅकमनी कॅरी करण्याच्या आमिषाने २५ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:10 AM2021-03-18T04:10:53+5:302021-03-18T04:10:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ब्लॅकमनी कॅरी करण्यासाठी २ हजार रुपयांच्या २५ लाखांच्या नोटांच्या बदल्यात ५० लाखांच्या ५०० रुपयांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ब्लॅकमनी कॅरी करण्यासाठी २ हजार रुपयांच्या २५ लाखांच्या नोटांच्या बदल्यात ५० लाखांच्या ५०० रुपयांच्या नोटा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रवीण प्रकाश वनकुंद्रे (वय ४८, रा. औंध), मालेश ऊर्फ महेश सुरेश गावडे (वय ४२, रा. चिंचवड) आणि व्यंकटरमना वसंतराव बाहेकर (वय ४०, रा. सिंहगड रोड) अशी पोलीस कोठडी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत हॉटेल व्यावसायिक अंतेश्वर जगन्नाथ शेवाळे (वय ३६, रा. शिवणे) याने फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात आणखी तिघांवर गुन्हा दाखल आहे. कसबा पेठ येथील सार्वजनिक रस्त्यावर २३ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. वनकुंद्रे हा फिर्यादीच्या ओळखीचा आहे. फिर्यादीने वनकुंद्रेच्या माध्यमातून नाशिक येथे शेअर बाजारात पैसे गुंतविले होते. त्यामध्ये नुकसान झाल्याने फिर्यादी तोट्याची रक्कम वनकुंद्रे याच्याकडे मागत होता. त्यावेळी वनकुंद्रे याने या स्कीमबद्दल माहिती दिली होती. या प्रकरणात तिघांना अटक करून न्यायालयात केले. त्यावेळी फरार साथीदारांच्या शोधासाठी, गुन्ह्यातील २५ लाख रुपये जप्त करण्यासाठी आणि त्याचे आणखी कोण साथीदार आहेत का, याच्या शोधासाठी तिघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर यांनी केली.