पेट्रोल पंपाची परमिशन मिळवून देतो, असे सांगून बेचाळीस लाख रुपयांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:16 AM2021-09-10T04:16:56+5:302021-09-10T04:16:56+5:30
संदेश अनंत म्हात्रे ( वय ४० वर्षे, सध्या रा. द्वारका सिटी, महाळुंगे, मूळ रा.चौल, ता. अलिबाग, जि. रायगड ) ...
संदेश अनंत म्हात्रे ( वय ४० वर्षे, सध्या रा. द्वारका सिटी, महाळुंगे, मूळ रा.चौल, ता. अलिबाग, जि. रायगड ) अशी फसवणूक झालेल्याचे नाव आहे. तर नंदलाल काशिनाथ यादव आणि अच्छेलाल काशिनाथ यादव (दोघे रा. सेकटोटी, ता. नुरपूर, जि. बलिया, उत्तर प्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्यांचे नावे आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, संदेश म्हात्रे यांना पेट्रोल पंप सुरू करावयाचा होता. काही निमित्ताने नंदलाल आणि अच्छेलाल यांच्याशी म्हात्रे यांची ओळख झाली. त्यावेळी त्यांनी म्हात्रे यांना पेट्रोल पंपाची मान्यता काढून देण्यासाठी मदतीचा बहाणा केला व मान्यतेसाठी पैसे लागतील असे सांगितले. सौदा ठरल्याप्रमाणे म्हात्रे यांनी यादव यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यात ३५ लाख ९६ हजार रुपये वेळोवेळी भरली, तसेच ६ लाख ४६ हजार रुपये रोख रक्कम देण्यात आली असे तब्बल ४२ लाख ४२ हजार रुपये घेऊन ही पेट्रोल पंपाची मान्यता मिळाली नाही, त्यामुळे त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येऊन त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी म्हाळुंगे पोलीस अधिक तपास करीत आहेत.