भागीदारी व्यवसायाच्या आमिषाने ७ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:09 AM2021-07-09T04:09:12+5:302021-07-09T04:09:12+5:30
यासंदर्भात अतुल रामदास काळे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऑक्टोबर २०१७ पासून आजअखेर मंचर येथील ओरिएंटल बँकेसमोर ...
यासंदर्भात अतुल रामदास काळे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ऑक्टोबर २०१७ पासून आजअखेर मंचर येथील ओरिएंटल बँकेसमोर रवींद्र शिवराम कड व राजू हिरामण रौंधळ यांनी संगनमताने फिर्यादी अतुल काळे यांना भागीदारीच्या उद्देशाने एलईडी टीव्हीच्या व्यवसायासाठी ५० टक्के भागीदारी देण्याचे कबूल केले. काळे यांच्या वडिलांच्या खात्यावर असलेली व स्वतःकडील रोख रक्कम असे एकूण ७ लाख २५ हजार घेऊन व्यवसायात कोणतीही भागीदारी न देता व्यवसाय बंद केला. काळे यांचा नवीन घेतलेला ट्रॅक्टर स्वतःकडे ठेवून त्याचा मोबदला न देता फसवणूक केली आहे. याबाबत काळे यांनी वारंवार पैशाची मागणी केली असता त्यांना दमदाटी करून तुला काय करायचे ते कर, अशी धमकी दिली. याप्रकरणी अतुल रामदास काळे (रा. भावडी, ता. आंबेगाव) यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन शिंदे करत आहेत.