ऑनलाईन सेकंड हॅण्ड गाडी विक्रीव्दारे सात लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:12 AM2021-03-31T04:12:14+5:302021-03-31T04:12:14+5:30

याबाबत पोलिसांनी दिलीली माहिती अशी की, अधिक माहिती शिक्रापूर येथील ईको ग्राम सोसायटीत राहणारे प्रणाल जगताप व ऋषिकेश ...

Fraud of Rs 7 lakh through online second hand car sales | ऑनलाईन सेकंड हॅण्ड गाडी विक्रीव्दारे सात लाखांची फसवणूक

ऑनलाईन सेकंड हॅण्ड गाडी विक्रीव्दारे सात लाखांची फसवणूक

Next

याबाबत पोलिसांनी दिलीली माहिती अशी की, अधिक माहिती शिक्रापूर येथील ईको ग्राम सोसायटीत राहणारे प्रणाल जगताप व ऋषिकेश जगताप या दोघा बांधवांना सेकंड दुचाकी घ्यायची असल्याने त्यांनी सेकंड वस्तू मिळणाऱ्या इंटरनेट वरील ओएलएक्स ॲप वर दुचाकीची पाहणी केली त्यावेळी त्यांना ॲक्टिवा (एम एच १४ एफ वाय ९४३३) दुचाकी दिसली, दरम्यान प्रणाल जगताप व ऋषिकेश जगताप यांनी ती गाडी घेण्याबाबत ॲपवर रिक्वेस्ट टाकली. त्यानंतर शैलेश कुमार व अमित कुमार नावाच्या व्यक्तीने जगताप यांच्याशी फोनवर संपर्क साधला, ही दुचाकी वीस हजार रुपये मध्ये देण्याचे कबूल केले. त्यामुळे ऋषिकेश जगताप याने शैलेश कुमार व अमित कुमार यांनी सांगितलेल्या बँक अकाउंटवर काही पैसे पाठवले. परंतु शैलेश कुमार व अमित कुमार नावाच्या व्यक्तींनी वेळोवेळी कारणे सांगून २४ मार्च २०२१ ते २६ मार्च २०२१ पर्यंत तब्बल ७ लाख ४० हजार ९९० रुपये जगताप यांच्या खात्यावरून ट्रान्सफर करून घेतले, त्यानंतर दोघांचे फोन बंद झाले व त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे प्रणाल जगताप, ऋषिकेश जगताप यांच्या लक्षात त्यांनी पोलिसात फिर्याद दिली त्यानुसार गुन्ह्याची नोंद झाली. पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नवनाथ रानगट हे करत आहे.

Web Title: Fraud of Rs 7 lakh through online second hand car sales

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.