शेतकऱ्याची व्यवसाय करू म्हणून साडेपाच लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:10 AM2021-04-24T04:10:45+5:302021-04-24T04:10:45+5:30

याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सुदाम रांजणे यांची अभिजित मुळे याने भेटीतून ...

Fraud of Rs | शेतकऱ्याची व्यवसाय करू म्हणून साडेपाच लाखांची फसवणूक

शेतकऱ्याची व्यवसाय करू म्हणून साडेपाच लाखांची फसवणूक

googlenewsNext

याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सुदाम रांजणे यांची अभिजित मुळे याने भेटीतून झालेल्या ओळखीतून मुळे याने प्रिंटिंग बँगचा व्यवसाय असल्याचे सांगितले. रांजणे यांना गोड बोलून व्यवसाय वाढवून भागीदारीत व्यवसाय करून आर्थिक फसवणूक करुन अडकवले. त्यामुळे व्यवसाय वाढीसाठी पैसे लागतील असे सांगत त्यातून तुम्हाला त्याचा लाभ होईल, असे सांगत नसरापूर येथे स्वामी समर्थ बँग प्रिंटिंग नावाने भागीदारीत व्यवसाय सुरू केला होता.

अल्पावधीत मुळे याने रांजणे यांना बॅग शिलाई व प्रिंटिंग मशीन खरेदीसाठी सदाशिव यशवंत मांडवे याला एक लाख रुपये पाठवण्यास सांगितले अन् रांजणे यांनी भूलथापातून पैसे पाठविले. तरीही आर्थिक बाबीत अडकवत दुकान भाडे व मशिनरी खरेदीसाठी दीड लाख रुपये, नंतर पुन्हा शिलाई मशीनसाठी हजार रुपये रोख असे मिळून ५ लाख ४६ हजार रुपये मुळे व मांडवे यांनी घेतले होते. तद्नंतर होत असलेल्या व्यवसायाची माहिती रांजणे यांना देण्याचे टाळले. त्यामुळे रांजणे यांना व्यवसाय अजूनही सुरू न झाल्याने संशय आला. त्यावेळी माहिती काढल्यानंतर व्यवसाय अजूनही सुरू होत नाही हे जाणवल्यानंतर वेळोवेळी मुळे यांच्याशी संपर्क साधला. मात्र मुळे व मांडवे याने तेथून पोबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी मुळे व मांडवे यांच्या विरोधात राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणातील अभिजित मुळे व सदाशिव मांडवे हे दोघेही बेपत्ता आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रमोद भोसले पुढील तपास करत आहेत. सदर आरोपी अभिजित मुळे याने अजून कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी राजगड पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी केले आहे.

Web Title: Fraud of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.