फार्मफाऊसमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवित फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:12 AM2021-04-02T04:12:14+5:302021-04-02T04:12:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मुळशीतील माले येथे विविध सोई-सुविधायुक्त फार्म हाऊससाठीच्या प्लॉटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून, प्रत्यक्षात संबंधीत ...

Fraud showing the lure of investing in a farmhouse | फार्मफाऊसमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवित फसवणूक

फार्मफाऊसमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवित फसवणूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मुळशीतील माले येथे विविध सोई-सुविधायुक्त फार्म हाऊससाठीच्या प्लॉटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून, प्रत्यक्षात संबंधीत प्लॉटवर सोई-सुविधा उपलब्ध न देता ग्राहकाची १ कोटी ८५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी पौड पोलिस ठाण्यात दोन विकसकांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुकेश मदनलाल छाजेड, मनोज मदनलाल छाजेड (दोघेही रा. शुक्रवार पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्या विकसकांची नावे आहेत. याप्रकरणी श्वेता मोदी (वय ३७, रा. हडपसर) यांनी पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मोदी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मोदी या त्यांचे पती केयुर किरीटकुमार मोदी यांच्यासमवेत शेती व जमीन खरेदी-विक्रीचा व्यावसाय करतात. सप्टेंबर २०१८ मध्ये त्यांच्या ओळखीचे मनोज छाजेड व त्याचा भाऊ मुकेश छाजेड हे दोघेजण भेटले. त्यांनी फिर्यादी यांना मुळशी तालुक्यातील माले येथे त्यांची ४३ एकर १२ गुंठे शेतजमीन असून तेथे ‘सेरेना फार्मस’ या नावाने फार्म हाऊससाठीचा प्रकल्प राबवित असल्याचे सांगितले. संबंधीत प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्याची गळ घातली. संबंधीत शेतजमिनीवर प्रत्येक एक एकर जमिनीवर फार्महाऊस करण्याचे नियोजीत असल्याचे सांगून संबंधीत फार्म हाऊसच्या प्लॉटपर्यंत जाण्यासाठी कॉंक्रीटचे पक्के रस्ते व गटारे, पाण्याची सोय, ड्रिप इरीगेशन, वीज जोडणी, क्लब हाऊस, व्यायामशाळा, जलतरण तलाव, जंगल अ‍ॅडव्हेंचर क्लब, नेचर फॉरेस्ट रिसॉर्ट, कॉटेजस, जंगल सफारी अशा अद्ययावात सोई-सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगितले. संबंधीत फार्महाऊसच्या प्लॉटमध्ये गुंतवणूक केल्यास एक ते दोन वर्षात त्याच्या किंमती तीन पट होतील, अशी बतावणी केली. त्यांच्या भुलथापांना बळी पडून फियार्दींनी तेथील गट क्रमांक ४३५/८ मध्ये प्रत्येकी एक एकर शेतजमीनीचे पाच प्लॉट फियार्दीचे पती केयुर मोदी यांच्या नावे, तर दोन प्लॉट फियार्दींनी स्वत:च्या नावावर खरेदी केली. त्यासाठी त्यांनी ७ फार्महाऊसच्या खरेदीपोटी मुकेश व मनोज छाजेड यांना खरेदीखत करताना वेळोवेळी १ कोटी ८५ लाख रुपयांची रक्कम विविध बँक खात्यांवर दिली. त्याचवेळी त्यांनी २०१९ पर्यंत फार्महाऊससाठी आवश्यक सर्व सोई-सुविधा २०१९ पर्यंत करुन देण्याचे कबुल केले होते. परंतु अद्यापर्यंत विकसकांनी संबंधीत ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यामुळे फिर्यादींना तेथे फार्महाऊस बांधता आले नाही. फार्महाऊस विक्रीच्यावेळी त्यांनी दिलेला नकाशा देखील प्राधिकृत अधिकार्‍यांकडून मंजुर केला नाही, तसेच संबंधीत प्रकल्पामध्ये करायच्या असलेल्या विकसनाच्या कामांकरीता कायदेशीर परवानगीही घेतली नसल्याचे फिर्यादींच्या निदर्शनास आले. संबंधीत विकसकांनी फियार्दीसह अन्य ३१ गुंतवणूकदारांची याच पद्धतीने फसवणूक केली आहे. दरम्यान, फिर्यादी यांनी विकत घेतलेल्या जमीनीमध्ये त्यांच्या प्रतिनिधींना जाण्यास मज्जाव करीत हातपाय तोडण्याची व जीवे मारण्याची धमकी दिली. पौड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Fraud showing the lure of investing in a farmhouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.