बनावट फेसबुकद्वारे महिलेची बदनामी, सायबर गुन्हे शाखेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 02:17 AM2018-08-26T02:17:41+5:302018-08-26T02:17:55+5:30
बनावट फेसबुक खाते तयार करून त्याद्वारे महिलेची बदनामी करणाऱ्या एकाला सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले आहे
पुणे : बनावट फेसबुक खाते तयार करून त्याद्वारे महिलेची बदनामी करणाऱ्या एकाला सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले आहे. नील जॉर्ज (वय ४२, वानवडी) असे त्याचे नाव आहे. एकतर्फी प्रेमातून त्याने हा प्रकार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील तुकाईनगर परिसरात राहणाºया एका तरुणीच्या नावाने अज्ञात व्यक्तीने २०१३ पासून फेसबुकवर बनावट फेसबुक खाते तयार केले असून त्याद्वारे तिची बदनामी केली जात असल्याची तक्रार तरुणीने सायबर गुन्हे शाखेकडे केली होती. सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशी केल्यावर जॉर्जला
ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यावर त्याने तरुणीच्या ई-मेल आयडीची अनधिकृतरीत्या माहिती घेऊन त्यावर असणाºया फोटोंचा वापर करून बनावट फेसबुक खाते तयार केले. त्यानंतर खात्यावरून तिचे फोटो तिच्या मित्राच्या पत्नीला पाठवले. याद्वारे त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी तो हे कृत्य करत होता.
रिक्षेतील महिलेची पर्स हिसकावली