कृषिमित्र पदाच्या भरतीची जाहिरात फसवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:11 AM2021-07-25T04:11:12+5:302021-07-25T04:11:12+5:30
महाराष्ट्रातील संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये २८ हजार जागा भरणार असल्याचा दावा या फसव्या जाहिरातीत करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये महामंडळाच्या राष्ट्रीय ...
महाराष्ट्रातील संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये २८ हजार जागा भरणार असल्याचा दावा या फसव्या जाहिरातीत करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये महामंडळाच्या राष्ट्रीय कृषी विकास मिशन अंतर्गत महामंडळाद्वारे उच्च गुणवत्ता युक्त कृषी उत्पादनांना योग्य मूल्यावर उपलब्ध करण्यासाठी राज्यामधील पात्रतेच्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. याची अखेरची तारीख ६ ऑगस्ट आहे.
प्रत्येक गावात एक पद, वय २२ ते ३८ वर्षे, पात्रता १२ वी उत्तीर्ण कार्यक्षेत्र ग्रामपंचायत स्तर, मासिक वेतन ८ हजार पाचशे अशी जाहिरात आहे. ही जाहिरात फसवी असून अशी कुठलीही जाहिरात कृषी विभागाने काढली नसल्याने अधिकाऱ्यांनी सांगितले. या फसव्या जाहिरातीवर विश्वास ठेवू नये, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
कोट
अशा प्रकारची कोणतीही जाहिरात कृषी कृषिविभागातर्फे प्रसारित करण्यात आली नाही. ही जाहिरात चुकीची असून हे पद भरले जात नाही. हे पद भरण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव लागतो. तसेच त्या ग्रामपंचायतीत ठराव पास झाल्यानंतर गावातील माणूस निवडला जातो. प्रत्येक जिल्हा कार्यालयात आत्मा (अॅग्रीकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी) मार्फत ही भरती केली जाते.
- सपना ठाकूर, कृषी अधिकारी, हवेली तालुका