पुरंदर तालुक्यासाठी मोफत १ हजार रॅपिड अँटिजन किट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:08 AM2021-05-29T04:08:55+5:302021-05-29T04:08:55+5:30

तालुक्यातील सामान्य लोकांची तपासणी करताना बऱ्याच वेळा त्यांना तपासणीशिवाय परत जावे लागते. त्यामुळे त्यांची अडचण होते. तसेच या रोगाचे ...

Free 1000 Rapid Antigen Kits for Purandar taluka | पुरंदर तालुक्यासाठी मोफत १ हजार रॅपिड अँटिजन किट

पुरंदर तालुक्यासाठी मोफत १ हजार रॅपिड अँटिजन किट

Next

तालुक्यातील सामान्य लोकांची तपासणी करताना बऱ्याच वेळा त्यांना तपासणीशिवाय परत जावे लागते. त्यामुळे त्यांची अडचण होते. तसेच या रोगाचे निदान वेळेत व्हावे. त्यांच्यावर वेळेत उपचार व्हावेत यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी उज्ज्वला जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील पाच आरोग्य केंद्रात भाजपच्या वतीने अँटिजन किट उपलब्ध करून देण्यात येईल, असे राहुल शेवाळे यांनी सांगितले.

येत्या दोन दिवसांत दौंडचे आमदार राहुल कुल, आमदार भीमराव तापकीर, जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, जालिंदर कामठे, बाबा जाधवराव आदींच्या हस्ते नीरा, वाल्हे, परिंचे, बेलसर, माळशिरस या पाच केंद्रात याचा शुभारंभ करण्यात येईल.

हवेली व पुरंदर तालुक्यातील कोविड आटोक्यात यावा यासाठी भाजपच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच जास्तीत जास्त लोकांना वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे शेवाळे यांनी सांगितले.

Web Title: Free 1000 Rapid Antigen Kits for Purandar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.