महुडेत लसीकरणावेळी मोफत नाश्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:14 AM2021-09-08T04:14:07+5:302021-09-08T04:14:07+5:30
पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने तालुक्यातील गावोगावी लस उपलब्ध करून गावातील नागरिकांनी लस मिळावी व लस घेण्यासाठी इतरत्र धावपळ ...
पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने तालुक्यातील गावोगावी लस उपलब्ध करून गावातील नागरिकांनी लस मिळावी व लस घेण्यासाठी इतरत्र धावपळ करावी लागू नये. तरीसुद्धा ग्रामस्थ व महिला सकाळपासून नंबर लावून थांबलेल्या असतात. लस उपलब्ध करून देखील ग्रामस्थ लसीचा तुटवडा जाणवतो. महुडे ग्रामस्थांसाठी गावामध्ये ३०० लस उपलब्ध केली आहे, याचा फायदा करून घ्यावा या करीता व सकाळी लवकर नंबर लावून बसलेले असतात याचा विचार करून लस घेण्यासाठी रांगेत थांबलेल्या नागरिकांसाठी बिस्कीट पुडा व पाण्याची बॉटल देण्यात आली.
यावेळी भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस रवींद्र बांदल, नितीन दामगुडे, सरपंच संजय सुतार, प्रदीप पिलाणे, अंकुश दामगुडे, रामनाना दामगुडे, बापू पिलाणे, संपत दामगुडे, अजित बांदल, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : ०७ महुडे लसीकरण मोफत
फोटो - कोरोनाची लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना बिस्कीट पुडा व पाणी बॉटल देताना कार्यकर्ते.