महामार्ग घेणार मोकळा श्वास
By admin | Published: November 10, 2015 01:37 AM2015-11-10T01:37:08+5:302015-11-10T01:37:08+5:30
पुणे-नगर महामार्गावर वाहतुकीला अडथळा ठरणारी वाघोली, कोरेगाव भीमा, शिक्रापूरसह रांजणगाव, सरदवाडी दरम्यानच्या सर्वच अतिक्रमणांवर दि. १७, २१, २४ नोव्हेंबरदरम्यान सार्वजनिक
कोरेगाव भीमा : पुणे-नगर महामार्गावर वाहतुकीला अडथळा ठरणारी वाघोली, कोरेगाव भीमा, शिक्रापूरसह रांजणगाव, सरदवाडी दरम्यानच्या सर्वच अतिक्रमणांवर दि. १७, २१, २४ नोव्हेंबरदरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हातोडा मारण्यात येणार आहे. सन २०१२ नंतरच महामार्गावर प्रथमच कारवाई होणार असल्याने अनेक वर्षांपासून औद्योगिक कारखानदारांच्या तक्रारीला यश आले असल्याने दिवाळीनंतर पुणे-नगर महामार्ग अतिक्रमणमुक्त झालेला दिसणार आहे.
पुणे जिल्ह्यात पुणे-नगर महामार्गाचे चौपदरीकरण झाले. परंतु अनेक गावांमध्ये रस्ता अरुंद व त्यातच भर म्हणून बेशिस्त पार्किंग यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर झालेला आहे. रांजणगाव ते वाघोली या ३० किलोमीटर अंतर पार करण्यास पाच तास वेळ लागतो. या वाहतुककोंडी संदर्भात औद्योगिक कारखानदारांनी थेट मुख्यमंत्री कार्यालय व जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.
अनेक वर्षांपासून पुणे-नगर महामार्गावरील अतिक्रमणांबाबत वारंवार तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी अतिक्रमणांवर हातोडा मारण्याचे आदेश दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने महामार्गावर रस्त्याच्या मध्यापासून १३ ते १५ मीटर क्षेत्रातील सर्वच अतिक्रमणांवर थेट जेसीबीच्या साहायाने कारवाई होणार असल्याचे सांगतानाच दि. १७ नोव्हेंबर रोजी वाघोली, लोणीकंद, दि. २१ नोव्हेंबर रोजी कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापूर, कोंढापुरी, दि. २४ रोजी रांजणगाव, कारेगाव, सरदवाडी या गावांमध्ये ही कारवाई होणार असल्याचे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी सांगितले.