आरोग्य शिबिरात ३५५ रुग्णांची मोफत तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:11 AM2021-07-27T04:11:49+5:302021-07-27T04:11:49+5:30

डॉ. कथे डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक प्रा. डॉ. पंजाब कथे यांचे वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते ...

Free check up of 355 patients in health camps | आरोग्य शिबिरात ३५५ रुग्णांची मोफत तपासणी

आरोग्य शिबिरात ३५५ रुग्णांची मोफत तपासणी

Next

डॉ. कथे डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक प्रा. डॉ. पंजाब कथे यांचे वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते . या शिबिराला आ. अतुल बेनके , जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके , पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माऊली खंडागळे , लायन्स क्लबचे अध्यक्ष संपत शिंदे व सेक्रेटरी नरेंद्र गोसावी ,विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक संतोष खैरे ,दिलीप गांजळे , वैद्यकीय अधिकारी वर्षा गुंजाळ, ग्रामपंचायत सदस्या स्नेहल कांकरिया यांनी भेट दिली या सर्व शिबिराचे संचलन डॉ. पिंकी कथे व प्रा. डॉ. पंजाब कथे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.

या शिबिराचे नियोजन शिवाजी टाकळकर, रवींद्र वाजगे, नंदकुमार चिंचकर, अंबादास वामन, श्रीकांत फुलसुंदर, शामराव थोरात यांच्या सहकार्याने यशस्वी करण्यात आले.

यावेळी राम भालेराव, नारायण आरोटे, रामभाऊ सातपुते, सुकाजी मुळे, उमेश भालेराव, शिवाजी कुमकर, उषा टाकळकर, वैशाली फुलसुंदर, अश्विनी थोरात, पुष्पलता डोंगरे,संगीता ढमाले, सीमा कुमकर , स्वाती थोरात, मनिषा मुळे व उर्मिला वाजगे उपस्थित होते .

आरोग्य तपासणी शिबिरात मार्गदर्शन करताना प्रा . डॉ. पंजाब कथे

Web Title: Free check up of 355 patients in health camps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.