कोरोनाग्रस्त मृतदेहासाठी मोफत शववाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:12 AM2021-05-25T04:12:04+5:302021-05-25T04:12:04+5:30
हवेली तालुका शिवसेना व लाईफ केअर ॲम्ब्युलन्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरुवात आज ...
हवेली तालुका शिवसेना व लाईफ केअर ॲम्ब्युलन्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरुवात आज झाली. यावेळी लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष विठ्ठल काळभोर, कमलेश काळभोर, लाईफ केअर ॲम्ब्युलन्सचे संचालक सिद्धू चव्हाण, काका गायकवाड, दिगंबर जोगदंड आदी उपस्थित होते.
कवडीपाट टोलनाका ( कदमवाकवस्ती, लोणी काळभोर ) ते कासुर्डी ( ता. दौंड ) या परिसरात रहाणारा व्यक्ती कुठल्याही रुग्णालयात कोरोनामुळे रुग्ण मरण पावल्यास त्याचा मृतदेह रुग्णालयातून त्याच्या घरी किंवा त्याच्या गावातील स्मशानभूमीत मोफत पोहोच करण्यात येणार आहे. गेल्या दहा दिवसांत अकरा मृतदेह रुग्णालयातून स्मशानभूमीत मोफत पोहोचविण्यात आले आहेत. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊर, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबा, नायगाव, सोरतापवाडी, उरुळी कांचन, डाळींब, शिंदवणे, अष्टापुर, सहजपूर, कासुर्डी या गावातील रुग्णांसाठी ही मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.