उज्ज्वल योजनेअंतर्गत गरिबांना मोफत सिलिंडर, शेगडीचे वाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 01:46 AM2019-03-07T01:46:20+5:302019-03-07T01:46:26+5:30
सर्व घटकातील गरीब नागरिकांना मोफत गॅस सिलिंडर व शेगडीचे वाटप करण्यात आले.
मंचर : मंचरमधील नागरिकांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत कुलस्वामिनी गॅस एजन्सी घोडेगाव येथे मंचर शहर भाजपा युवानेते बाबू ऊर्फ सुशांत थोरात यांच्यावतीने व भाजपा शिरूर संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे यांच्या हस्ते सर्व घटकातील गरीब नागरिकांना मोफत गॅस सिलिंडर व शेगडीचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय पवार, संदीप बाणखेले, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष फैज जमादार, मंचर शहराध्यक्ष गणेश बाणखेले, तालुका प्रवक्ता नवनाथ थोरात, गॅस एजन्सी व्यवस्थापक जाधव, अटलबिहारी वाजपेयी विचार मंच पुणे जिल्हा पदाधिकारी व लाभार्थी उपस्थित होते. यावेळी ५० महिलांना गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले. आगामी काही दिवसांत मंचरमधील नागरिकांना अजून २०० गॅसचे वाटप करण्यात येणार असल्याचे बाबू थोरात यांनी सांगितले.
यावेळी जयसिंग एरंडे म्हणाले, ‘‘सरकारी योजनांचा लाभ विविध घटकांतील गरीब नागरिकांना मिळत आहे.’’ नवनाथ थोरात यांनी सूत्रसंचालन केले. गणेश बाणखेले यांनी आभार मानले.