बारामतीत म्युकरमायकोसिस मोफत रोगनिदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:11 AM2021-05-19T04:11:07+5:302021-05-19T04:11:07+5:30
नटराज नाट्य कला मंडळ व इंडियन डेंटल असोसिएशन बारामती व फलटण शाखेच्या वतीने बुधवारी (दि. १९) रोजी म्युकरमायकोसिस रोगनिदान ...
नटराज नाट्य कला मंडळ व इंडियन डेंटल असोसिएशन बारामती व फलटण शाखेच्या वतीने बुधवारी (दि. १९) रोजी म्युकरमायकोसिस रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाचे प्रमुख ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी दिली.
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डॉ. विश्वजित कदम व त्यांचे सहकारी दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत येथील तीन हत्ती चौकातील नटराज नाट्य कला मंदिर येथे रुग्णांची तपासणी करणार आहेत. सर्वांसाठी हे शिबिर विनामूल्य आहे. कोरोना आजारातून बाहेर पडलेल्या नागरिकांनी म्युकरमायकोसिसचा संभाव्य धोका टाळण्यासाठी या शिबिरात तपासणी करून घ्यावी, तपासणीसाठी येताना आपल्यावर झालेल्या उपचारांचे पेपर्स सोबत आणावेत, असे आवाहन नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष गुजर यांनी केले आहे.
———————————————