सोमवारपासून आंबेगावात मोफत धान्यवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:10 AM2021-05-08T04:10:40+5:302021-05-08T04:10:40+5:30
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने छोटे-मोठे व्यवसाय बंद आहेत. जिल्ह्यात काही गावांमध्ये कडकडीत लॉकडाऊन आहे. त्यामुळे गोरगरीब ...
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने छोटे-मोठे व्यवसाय बंद आहेत. जिल्ह्यात काही गावांमध्ये कडकडीत लॉकडाऊन आहे. त्यामुळे गोरगरीब लोकांना रोजगार मिळत नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. गरीब कुटुंबे उपाशी राहू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारकांना मोफत धान्य देण्याचे जाहीर केले होते. त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा मे महिन्याकरिता पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारकांना तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत देणार असल्याचे जाहीर केले होते. त्याची अंमलबाजवणी आंबेगाव तालुक्यात चालू झाली आहे.
याबाबत तालुका पुरवठा अधिकारी एस. एम. गायकवाड म्हणाले की, आंबेगाव तालुक्यात प्रत्येक गावात पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारकांना मोफत धान्याचे वाटप होईल.
--
गावातील सरकारमान्य धान्य दुकानदारांनी कमी धान्याचे वाटप केल्यास रेशनकार्डधारकांनी सरपंच व तलाठी यांच्याकडे तक्रार करावी. संबंधित दुकानदाराची चौकशी करून दोषी आढळल्यास त्या दुकानदाराचा परवाना रद्द करणार असल्याचे तहसीलदार रमा जोशी यांनी सांगितले.
--
फोटो क्रमांक : ०७ अवसरी आंबेगाव तालुका धान्यवाटप
फोटो : आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथे रेशन दुकानात धान्याचा ट्रक खाली करताना.