एसटी कर्मचारी आणि आईवडिलांसाठी मोफत नेत्र व आरोग्य शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:07 AM2021-06-17T04:07:42+5:302021-06-17T04:07:42+5:30

हेल्पेज इंडियाचे पुणे विभागप्रमुख राजीव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाच्या सहकार्याने या शिबिराचे ...

Free eye and health camp for ST staff and parents | एसटी कर्मचारी आणि आईवडिलांसाठी मोफत नेत्र व आरोग्य शिबिर

एसटी कर्मचारी आणि आईवडिलांसाठी मोफत नेत्र व आरोग्य शिबिर

Next

हेल्पेज इंडियाचे पुणे विभागप्रमुख राजीव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात नऊ ज्येष्ठ नागरिकांना माेतीबिंदू आढळला. या ज्येष्ठ नागरिकांची माेतीबिंदू शस्त्रक्रिया माेफत केली जाणार आहे. या वेळी पुणे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड, विभागीय वाहतूक अधिकारी दीपक घोडे, आगार व्यवस्थापक शिवकन्या थाेरात, सेवानिवृत्त आगार व्यवस्थापक रमेश हांडे, विभागीय लेखा अधिकारी श्रीमती पाठक, एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाच्या डॉ. प्रतिभा देशमुख, सहायक वाहतूक निरीक्षक महेश विटे, लेखाकार हिरामण दिघे, कार्यशाळा अधीक्षक गौरव काळे, रमेश तापकीर, कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, सचिव रमेश वाडेकर, गुलाब तिटकारे, प्रशांत नाईकडे, भारत वाबळे, संतोष एरंडे, रवि कडेकर, राजेश कांबळे, प्रदीप गुट्टे, महेश बिरदवडे, महादेव तुळसे आदी उपस्थित होते.

राजगुरुनगर एसटी आगारात जागतिक वृद्ध अत्याचार विराेधी जागरूकता वयोवृद्ध मोफत नेत्र व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Free eye and health camp for ST staff and parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.